Site icon लोकाशा-बंब न्यूज

ग्रामीण भागातील तिर्थक्षेत्रांच्या विकासासाठी सदैव कटीबद्ध -आ.संदीप क्षीरसागर, बीड मतदार संघातील जालींदरनाथ देवस्थान व आक्रुर देवस्थानला ‘ब’ दर्जा


बीड (प्रतिनिधी):- बीड मतदार संघातील ग्रामीण भागामध्ये असलेल्या तिर्थक्षेत्रांच्या विकासासाठी आम्ही सदैव कटीबद्ध आहोत. या तिर्थक्षेत्रांच्या विकास कामासाठी वेळोवेळी निधी उपलब्ध करून देण्यासाठी कायम तत्पर राहिल,असा शब्द आ.संदीप क्षीरसागर यांनी शिरूर कासार तालुक्यातील येवलवाडी येथील श्री.क्षेत्र जालींदरनाथ देवस्थानच्या अखंड हरिनाम सप्ताहातील काल्याच्या कीर्तनामध्ये उपस्थितांना दिला. बीड मतदार संघातील श्री.क्षेत्र जालींदरनाथ गड व श्री.क्षेत्र आक्रुर देवस्थान या तिर्थक्षेत्रांना ‘ब’ दर्जा मिळाला असून या संदर्भाने ते उपस्थित नागरिकांशी संवाद साधत होते.
        बीड मतदार संघातील शिरूर कासार तालुक्यामध्ये असलेल्या येवलवाडी येथील श्री.क्षेत्र जालींदरनाथ गड व बीड तालुक्यातील श्री.क्षेत्र आक्रुर देवस्थान उमरद जहाँगीर या दोन तिर्थक्षेत्रांना ग्रामीण तिर्थक्षेत्र विकास योजने अंतर्गत ‘ब’ वर्ग दर्जा देण्यासाठी आ.संदीप क्षीरसागर यांनी विशेष प्रयत्न केले. या प्रयत्नाअंती महाविकास आघाडी सरकारकडून दोन्ही देवस्थानांना ‘ब’ तिर्थक्षेत्र दर्जा मिळाला असून या बद्दल आ.क्षीरसागर यांनी जनतेशी संवाद साधला. शनिवार दि.9 एप्रिल रोजी श्री.क्षेत्र जालींदरनाथ गड येथे अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता होती. यावेळी सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प.विठ्ठल महाराज गहिनीनाथगडकर यांचे काल्याचे कीर्तन होते. यावेळी आ.संदीप क्षीरसागर यांनी येथील काल्याच्या कीर्तनास आपली उपस्थिती लावली व या पुढेही देवस्थानांच्या विकासासाठी लागेल तेवढा निधी मिळवून देवून या देवस्थानांचा विकास करु असे सांगितले.भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र जालिंदरनाथ गड व श्री क्षेत्र आक्रुर देवस्थान या दोन्ही देवस्थानांना ‘ब’ दर्जा मिळाला असून दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणात विकास कामे होणार असल्याने भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Exit mobile version