अंबाजोगाई (प्रतिनिधी)
लातुर चौपदरी रस्ता बर्दापुर फाट्या पर्यन्त कसा ? बीड जिल्ह्यात का नाही,खासदार काय करतात ? असा सवाल राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी येडेश्वरी कारखाना मेळव्यात केला.त्याला उत्तर देताना भाजपाचे राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी म्हणाले सदर रस्ता २०१२ साली झाला तेव्हा राज्यात सरकार राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस पक्षाचे होते.राजकिय दुराग्रह ठेवून तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी खोडसाळपणातून रस्ता बीडच्या सिमेवरच थांबवला
आमच्या नेत्या खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांनी विशेष परिश्रम करत ११ राष्ट्रीय महामार्ग बीड जिल्ह्यात आणले उरलेला रस्ता केवळ मुंडे भगिणी मुळेच जिल्ह्यात पुर्ण झाला.ज्या रस्त्यावरून उपमुख्यमंञी पवार हे कार्यक्रमाला आले ते सर्व रस्ते आमच्या खासदारांनीच पुर्ण केले असे उत्तर भाजपाचे राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी दिले
प्रसिद्धीसाठी दिलेल्या निवेदनात म्हटले की,काल उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी येडेश्वरी कारखान्यावर भाषणात आमच्या खासदारावर टिका करतांना लातुरचा चौपदरी रस्ता बर्दापुर फाट्या पर्यन्त का आला ? खासदार काय करतात हा सवाल ठणकावून विचारला
याला उत्तर देतांना कुलकर्णी म्हणाले.या प्रश्नावर अजितदादा पवारांनी अभ्यास करून बोलायला हवे होते.कारण,ज्या साली लातुरला जाणारा रस्ता चौपदरी झाला आणि तो बर्दापूर फाट्या पर्यन्त केला.तो काळ राज्यात राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस पक्षाचा होता.तेव्हा केंद्रात सुद्धा त्यांचे सरकार होते.तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी खोडसाळपणातून बीड जिल्ह्यात चौपदरी रस्ता केला नाही.अजितदादांनी अंदाजपत्रक आणि मंजुरी काळ पाहिल्या नंतर त्यांना कळून चुकेल.डॉ.प्रितमताई खासदार झाल्या नंतर उर्वरित चांगला रस्ता जो सिमेन्ट कॉंक्रीटचा आहे.तो केवळ खासदार आणि आमच्या नेत्या पंकजाताई साहेबा मुळेच मार्गी लागला ज्याची लांबी जामखेड नगर पर्यन्त आहे.खासदारांच्या पुढाकरामुळे बीड जिल्ह्यात एकूण ११ राष्ट्रीय महामार्ग आले
दळण वळणाच्या दृष्टीने बीड जिल्हा देशाच्या नकाशावर आला ज्या कारखान्यावर उपमुख्यमंत्री काल आले.तिथे जाणारा गुळगुळीत रस्ता आमच्या खासदारांच्या प्रयत्नातून झाला.मात्र येडेश्वरी कारखान्यावर जाण्यासाठी रस्त्याची अवस्था बजरंग सोनवणे यांनी काल भाषणात उपमुख्यमंत्री यांच्या समोर विषद केली.त्याला जबाबदार विद्यमान सत्ताधारीच आहेत असे कुलकर्णी यांनी म्हटले.आमच्या खासदारानी काय केले ? हे बीड जिल्ह्यातील माय बाप जनतेला माहित आहे.तुमच्या उमेदवाराचा निवडणुकीत दणदणीत पराभव केला.हे तुम्ही लक्षात ठेवा असे निवेदनात म्हटले आहे.