धारूर, दि. 7 (लोकाशा न्यूज) : धारूर तालुक्यातील उमराई वस्तीवर सहायक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत आणि धारूर पोलिस ठाण्याचे ठाणेदार विजय आटूळे तपासाच्या अनुषंगाने कोम्बिंग ऑपरेशन राबविले, या ऑपरेशनमध्ये एका सोळंके नामक व्यक्तीकडील तब्बल 13 लाख 21 हजार रूपयांची रक्कम मिळाली आहे. दरम्यान ही रक्कम नेमकी त्या व्यक्तीकडे कुठून आणि कशी आली यासंदर्भात धारूर पोलिस कसून तपास करत आहे.
धारूर ठाण्याच्या परिसरात एका गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले, यावेळी आडस परिसरात असलेल्या उमराई वस्तीवर पोलिसांनी झाडाझडती घेतली. या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या सोळंके नामक व्यक्तीकडे तब्बल 13 लाख 21 हजार रूपयांची कॅश मिळून आली, त्याने ही कॅश कुठून आणली आणि ती नेमकी कशाची आहे, यासंदर्भात धारूर पोलिस तपास करत आहे. सदर व्यक्तीवर 124 प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. संबंधित व्यक्ती सदर कॅश चटईच्या व्यवसायाची असल्याचे सांगितले आहे. मात्र त्याच्याकडे एकही चटई आढळून आली नसल्यामुळे धारूर पोलिसांचा त्याच्यावर आणखी संशय वाढलेला आहे. त्यामुळे आता आणखी या प्रकरणाच्या तपासात पोलिसांच्या हाती नेमक्या कोणकोणत्या गोष्टी लागतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.