Site icon लोकाशा-बंब न्यूज

सीईओंच्या दणक्याने जुगारी ताळ्यावर ,  कारवाई करून जुगार्‍यांना दाखवला घरचा रस्ता  


बीड, दि. 7 (लोकाशा न्यूज) : झेडपीच्या नव्या बिल्डींगच्या परिसरात काही जण पत्ते तर काही जण बिनधास्तपणे गांजाची चिलींग फुकताना पहायला मिळत होते, हा सगळा प्रकार दै. लोकाशाने समोर आणला होता, यावर तात्काळ अ‍ॅक्शन घेत जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने त्या जुगार्‍यांना घरचा रस्ता दाखविला आहे. विशेष म्हणजे याठिकाणी त्यांना आता साधे बसण्यासही मनाई करण्यात आली आहे.
बीड जिल्हा परिषदेच्या नव्या ईमारतीचे काम जवळपास पुर्ण झालेले आहे, त्यानुसार याच नव्या ईमारतीमधून सध्या जिल्हा परिषदेचा पुर्ण कारभार सुरू आहे. जि.प.चा परिसर मोठा आहे, ही एक पवित्र जागा आहे, पवित्र असणार्‍या या जाग्याला मात्र काही जणांनी जुगाराचा अड्डाच बनविला होता, कारण या परिसरातच अनेक जण थेट गांजा टाकून चिलींम फुकत होते, तर काही जण पत्तेही खेळत होते, हा सगळा प्रकार दै. लोकाशाने समोर आणला होता, यावर सीईओ अजित पवार यांनी तात्काळ अ‍ॅक्शन घेतली, त्यानुसार त्या पोलिस प्रशासनाची मदत घेवून जुगार्‍यांना अद्दल घडवत त्यांना घरचा रस्ता दाखविण्यात आला.  तसेच त्यांना आता याठिकाणी साधे बसण्यासही मनाई करण्यात आली असून हा जुगार्‍यांना मोठा दणकाच समजला जात आहे.

Exit mobile version