Site icon लोकाशा-बंब न्यूज

पंकजाताई मुंडे यांनी नवीन वर्षानिमित्त ‘वैद्यनाथ’ च्या सभासदांचे केले तोंड गोड,सभासदांना आठ केंद्रावरून सुरू झाली सवलतीच्या दरात साखर वाटप

परळी ।दिनांक २९।
वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षा पंकजाताई मुंडे यांनी मराठी नववर्षानिमित्त सभासदांचे तोंड गोड केले आहे. त्यांच्या आदेशानुसार कारखान्याच्या सर्व सभासदांना तालुक्यातील आठ केंद्रावरून सवलतीच्या दरात आजपासून प्रत्यक्षात साखर वाटप सुरू झाले आहे. गुढीपाडव्याला साखर मिळाल्याने सभासदांमध्ये आनंद व्यक्त होत आहे.

दिवाळीत कारखाना सुरू नव्हता म्हणून यंदा मराठी नववर्ष  गुढी पाडव्याच्या निमित्ताने सभासदांना सवलतीच्या दरात साखर वाटप करण्याची सूचना  पंकजाताई मुंडे यांनी केली होती,  त्यांच्या सुचनेप्रमाणे कारखान्याने तालुक्यात नियुक्त केलेल्या आठ केंद्रावरून आजपासून साखर वाटप सुरू झाले. सभासदांना 3 एप्रिलपर्यंत सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ठरवून दिलेल्या ठिकाणी साखरेचे वाटप केले जाणार आहे. सभासदांना २५ रूपये किलो प्रमाणे प्रति शेअर दहा किलो साखर देण्यात येत आहे. साखर वाटपाचे आठ  केंद्र  पुढीलप्रमाणे -  परळी वैजनाथ विभाग (शेतकी विभागीय कार्यालय, एन. एच. इंजिनियरींग काॅलेज समोर, टोकवाडी), नाथरा विभाग (बालवाडी शाळा, केन अकौंटंच्या बाजुला, कारखाना साईट), पांगरी विभाग ( पांगरी गट कार्यालय, नंबर टेकचे बाजुस पांगरी), सिरसाळा (सिरसाळा शेतकी कार्यालयाचे जवळ सिरसाळा), कासारवाडी विभाग (सिरसाळा शेतकी कार्यालयाचे जवळ, सिरसाळा), नागापुर विभाग (नागापुर शेतकी कार्यालयाचे जवळ, नागापुर), धर्मापुरी विभाग (धर्मापुरी शेतकी कार्यालय धर्मापुरी), घाटनांदुर विभाग (पुस शेतकी कार्यालयाजवळ, पुस). सभासदांनी आपले ओळखपत्र दाखवून साखर घेऊन जावी असे आवाहन कारखान्याच्या वतीने करण्यात  आले आहे.

••••

Exit mobile version