Site icon लोकाशा-बंब न्यूज

खा. प्रितमताईंच्या सुचनेनंतर ऑनलाइन पासपोर्ट व्हेरिफिकेशन सुरू ; सलीम जहाँगीर यांच्या मागणीला यश

बीड ( प्रतिनिधी ) पोलीस अधीक्षक कार्यालयातील ऑनलाइन पासपोर्ट व्हेरिफिकेशन अखेर सुरू झाले आहे. गेल्या तीन महिन्यांपासून व्हेरिफिकेशन बंद होते. यासंदर्भात खा. प्रितमताई मुंडे यांनी स्वतः पाठपुरावा करत पोलीस प्रशासनाला सूचना दिल्या. भाजप नेते सलीम जहाँगीर यांनी केलेल्या मागणीला यश आले आहे. याप्रश्नी त्यांनी स्वतः प्रभारी पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांनाही निवेदन दिले होते. अखेर ऑनलाइन पासपोर्ट व्हेरिफिकेशन सुरू झाले असून संबंधित नागरिक, विद्यार्थ्यांनी व्हेरिफिकेशन करून घ्यावे असे आवाहन सलीम जहाँगीर यांनी केले आहे.

बीड जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातील ऑनलाइन पासपोर्ट व्हेरिफिकेशन बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांची आणि हज यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ लागली होती. अनेक अडचणी देखील येत होत्या. यासंदर्भात भाजप नेते सलीम जहाँगीर यांनी जिल्ह्याच्या लोकप्रिय खा. प्रीतमताई मुंडे यांच्यासह प्रभारी पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांना निवेदन दिले होते. याची दखल घेत पोलिस अधीक्षकांनी ऑनलाइन पासपोर्ट व्हेरिफिकेशन कार्यालयातील डिजिटल स्वाक्षरी उपलब्ध करून व्हेरिफिकेशन आज पासून सुरू केले आहे. ज्या नागरिकांन, विद्यार्थ्यांनी ऑनलाईन व्हेरिफिकेशनसाठी अर्ज केलेला आहे. त्यांनी तातडीने पोलीस अधीक्षक कार्यालयातील संबंधित विभागाची संपर्क करून पासपोर्ट व्हेरिफिकेशन करून घ्यावे असे आवाहन भाजप नेते सलीम जहाँगीर यांनी केले आहे.

Exit mobile version