बीड प्रतिनिधी,
लिंबागणेश जिल्हापरिषद सर्कलमधील सामान्य माणसांच्या मुलभूत प्रश्नांकडे पुढार्यांनी विशेष लक्ष न दिल्यामुळे विकास होऊ शकला नाही. विकासाचा अनुशेष वाढत गेला आहे. डोंगर पट्यात वाडी-वस्तीवरील जनतेचे रस्त्याच्या अभावामुळे प्रचंड हाल झाले. परंतु मागील पाच वर्षात जनतेने मला लोकसेवेची संधी दिली. विविध शासकीय योजनांचा प्रामाणिकपणे प्रयत्न करून प्रत्येक गाव-खेड्यापर्यंत विकासकामे पोहचून मुलभूत सोयी सुविधा देण्याचा प्रयत्न केला . तत्कालीन ग्रामविकास मंत्री लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांच्या माध्यमातून वरवटी- भाळवणी-लिंबागणेश हा रस्ता पूर्ण करून डोंगर पट्यातील गावे मुख्य रस्त्याला जोडली. नाबार्ड योजनेतून भाळवणी- पिंपळवाडी रस्त्यावरील बिंदुसरा नदीवर पूल बांधण्यासाठी साडे पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे. या पूल कामाची निविदा प्रक्रिया चालू असून लवकरच हे काम सुरू होईल. डोंगर पट्यातील रस्त्यासाठी निधी कमी पडू देणार नाही असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी डोकेवाडा येथे उपस्थित लोकसमुदायापुढे व्यक्त केला.
आज लिंबागणेश जिल्हा परिषद गटातील गट-ब विकास निधी अंतर्गत डोकेवाडा ते इजिमा 115 रस्ता सुधारणा खडीकरण व मजबूतीकरण कामाचा शुभारंभ..भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के साहेब यांच्या शुभहस्ते आज संपन्न झाला.
या समारंभास सरपंच बप्पासाहेब कदम,उपसरपंच बाबुराव कदम, डोके आसाराम, कदम राधाकिसन,डोके सुग्रीव, कदम महादेव, पुरुषोत्तम डोके,,कदम भास्कर,डोके मलमत,किसनराव डोके, कदम बाबासाहेब,, वाळेकर अरुण,सापते मच्छिंद्र, वाळेकर आजिनाथ, वाळेकर ईश्वर वाळेकर हारी, मोहन डोके ,बन्शी डोके,सोमिनाथ डोके,सापते नारायण ,सापते ईश्वर, कदम रामहरी,वाळेकर जयराम,,सस्ते आप्पाराव, वाघ हरिश्चंद्र, आनपट अनिल,सस्ते मारोती,वाघ बाजीराव,सापते रावसाहेब,शरद बडगे, महादेव बहीरवाळ,शाम कोटुळे, बाळासाहेब गात,सतिष कळसूले, रविंद्र कळसाने यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
मागील चार दिवसापूर्वीच श्री बेलेश्वर येथे लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते जवळपास बत्तीस कोटींच्या विविध विकास कामाचे लोकार्पण व उद्घाटन समारंभ पंधरा हजार लोकांच्या साक्षीने पार पडला. या विकास पर्वाची चर्चा जिल्हाभरात झाली. या गटात विकास करताना अत्यंत निकडीच्या कामांना प्राधान्य दिले गेले. लोकांच्या मागणीप्रमाणे पाठपुरावा करून मुलभूत समस्यांचे निराकरण करून विकासकामांच्या माध्यमातून जनतेला दिलासा दिला. सत्ता असो अथवा नसो,चिवटपणे शासन दरबारी प्रत्येक कामांसाठी निधी खेचून आणला.यामुळे लिंबागणेश सर्कलने परिपूर्ण विकासाकडे वाटचाल केली.राजेंद्र मस्के यांच्या लोकाभिमुख काम करण्याची पद्धत व विकासाचे राजकारण यामुळे जनतेची नाळ भारतीय जनता पार्टीशी जुळली गेली आहे.