बीड, दि. 15 (लोकाशा न्यूज) : खा. प्रीतमताई ह्या बीड जिल्हाबरोबरच राज्यातील अनेक महत्वाच्या प्रश्नावर दिल्लीस्तरावर आवाज उठवत आहेत, मंगळवारी अधिवेशनात त्यांनी
ग्रामीण भागातील खेळाडूंच्या प्रश्नांकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधून घेतले, विशेष म्हणजे यावेळी त्यांनी राहुल आवारे यांच्या कामगिरीचा लेखाजोखा मांडून ग्रामीण खेळाडूंना पुढे घेऊन जाण्याचा माणस व्यक्त केला. त्यावर त्यांच्या या प्रश्नाचे कौतुक करत केंद्रीय राज्य मंत्र्यांनी सकारात्मक उत्तर दिले.
मंगळवारी लोकसभेच्या प्रश्नकाळात आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक समिती सत्रात सहभागी होऊन ग्रामीण भागातील खेळाडूना जागतिक स्तरावर प्रदर्शन करण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारतर्फे सुरू असलेल्या प्रयत्नांचा मुद्दा खासदार प्रीतमताईंनी मांडला. यावेळी बीडच्या राहुल आवारे यांनी केलेल्या कामगिरीचा लेखाजोखाही त्यांनी यावेळी सर्वांसमोर मांडला. आज ग्रामीण भागातील अनेक खेळाडू राष्ट्रीय पातळीवर चांगले प्रदर्शन करत आहेत, अशा खेळाडूंना पुढे आणण्यासाठी राज्यांच्या व्यतिरिक्त केंद्र सरकार काही विचार करत आहे का? असा प्रश्नही यावेळी उपस्थित केला. यावर त्यांच्या या प्रश्नांचे कौतुक करत केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांनी सकारात्मक उत्तर दिले.
ग्रामीण भागातील खेळाडूंच्या प्रश्नांकडे खा. प्रीतमताईंनी केंद्र सरकारचे लक्ष वेधले, राहुल आवारे यांच्या कामगिरीचा लेखाजोखा मांडून ग्रामीण खेळाडूंना पुढे घेऊन जाण्याचा व्यक्त केला मानस
