Site icon लोकाशा-बंब न्यूज

‘बीडचा बिहार झाला ही राष्ट्रवादीचीच कबुली’ पंकजाताईंनी फक्त जिल्ह्याचे वास्तव मांडले, दुसर्‍याकडे बोट दाखविण्यापेक्षा पालकमंत्र्यांनी स्वत:चा कारभार निट हकावा

बीड, दि. 13 (लोकाशा न्यूज) : जिल्ह्यात दररोज घडत असलेल्या गुन्हेगारीवर लोकनेत्या पंकजाताईंनी आवाज उठविला, जिल्ह्याचे वास्तव सरकार समोर आणून दिले, यादरम्यानच बीड जिल्ह्याचा बिहार झाला अशी कबूलीच थेट राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अधिवेशनात दिली, यातून पालकमंत्र्यांनीच आपला कारभार कसा आणि किती बिघडलेला आहे यावर चिंतन करावे, पंकजाताईंवर केलेली टिका आम्ही कदापी खपवून घेणार नाही, अशी जहरी टिका भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी केली आहे.
पुरोगामी महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारने सावळा गोंधळ मांडला. कोणाचा पायपोस कोनात नाही. भ्रष्टाचार, घोटाळे आणि गैर व्यवहार राज्यकर्ते मशहुल असून सामान्य जनतेला वार्‍यावर सोडले. आज राष्ट्रवादीचे दोन मंत्री तुरुंगात आहेत. विकासाच्या नावाने ठणठनाट असून समाजातील कोणताही घटक समाधानी नाही. कायदा व सुव्यवस्था कमालीची बिघडली. मंत्रिपद भूषवणारे मतदार संघापुरताच संकुचित विचार करतात. राजकीय हेतूने प्रेरित होऊन, योजना राबवल्या जातात. यामुळे राज्याच्या विकास खुंटला राज्याच्या तुलनेत बीड जिल्ह्याचा विचार केला तर, प्रगतिचा आलेख ढासळला. जिल्ह्यात विकास निधीचा तुटवडा झाला. तत्कालीन पालकमंत्री लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांनी सुरु केलेल्या विकास वाटेवरच आजही जिल्ह्याचा विकास कासाव गतीने चालू आहे. पालकमंत्री म्हणून राज्यकर्त्याने जिल्ह्याच्या सर्वंकष विकासासाठी कोणतेही भरीव काम अद्याव केलेले नाही. जिल्हा प्रशासनावर जरब आणि धाक नाही. प्रत्येक विभागात अनागोंदी कारभार राहिलेला नाही.प्रशासनात शेकडो रिक्त जागा असल्याने प्रशासनाचा कारभार धीम्म झाला. जनतेला लहान सहान कामासाठी हेलपाटे मारावे लागतात. चिरीमिरी दिल्याशिवाय फाईल हालत नाही. पोलिसांचा धाक नसल्याने सर्रास गुन्हेगारी प्रवृत्ती वाढली. बिघडलेल्या कारभाराचे आणि सामान्य जनतेचे हाल अपेष्टा आणि दुख लोकनेत्या पंकजाताईनी मांडले. ते बदनामीसाठी नव्हे. तर,सामान्य जनतेला न्याय देण्याची जबाबदारी राज्यकर्त्याने स्वीकारावी यासाठीच त्या बोलल्या. आणि विरोधक म्हणून तो त्यांचा अधिकार आहे. अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी दिली आहे. स्वत: कर्तव्यापासून परागंदा होऊन पालकमंत्री बदनामीची ढाल करून आपल्या निष्क्रियतेवर पांघरून टाकण्याचा प्रयत्न करून सक्षम विरोधक भारतीय जनता पार्टीला व नेत्यांना टार्गेट करत आहेत. आपण राज्यकर्ते आहोत स्वहितापेक्षा लोकहिताला प्राधान्य दिले पाहिजे याचे भान राहिलेले नाही.बीड जिल्हा मागास आहे हे संपूर्ण महाराष्ट्राने मान्य केले परंतु बीड जिल्हा बिहार झाला याची स्पष्ठ कबुली राज्याच्या सर्वोच्च सभागृहात राष्ट्रवादीच्या नेत्यानेच दिली आहे. लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांच्याकडे बदनामीचे बोट दाखवण्यापेक्षा आपल्या सहकारी आमदारांचे समाधान करण्यात निष्फळ ठरलात हे जिल्ह्यातील जनतेने उघड्या डोळ्याने पहिले. सभागृहातील राष्ट्रवादी आमदारांची भाषण शब्दश: जिल्ह्यातील खेड्यापाड्यातील जनतेला ऐकवली तर,शरमेने मान कुणी खाली घालायची हा प्रश्न उभा राहील. त्यामुळे पालकमंत्र्यांनी बदनामीची ढाल पुढे करू नये. माझा जिल्हा माझी या मतीसी नाळ आणि इमान आहे. हा कांगावा न करता संवेदनशील वृत्तीने विवेकबुद्धी वापरून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सत्तेची ताकद वापरावी. प्रसिद्धीसाठी विरोधकांना डिवचण्यापेक्षा आत्मचिंतन करावे. उर्वरित सत्तेच्या कालावधीत जिल्ह्यातील सामान्य जनतेच्या हितासाठी धडाडीने कामे करून आपल्या कर्तुत्वाची रेषामोठी ओढावी, असे भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी म्हटले आहे.

दुसर्‍यांकडे बोट दाखविण्यापेक्षा पालकमंत्र्यांनीच
कारभार व्यवस्थित हकावा
जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे. याला केवळ आणि केवळ पालकमंत्रीच जबाबदार आहेत, त्यामुळे पालकमंत्र्यांनीच आपला कारभार व्यवस्थित हकावा, असेही मस्के यांनी म्हटले आहे.

Exit mobile version