Site icon लोकाशा-बंब न्यूज

अखेर ठरले, बीड जिल्हा परिषदेच्या प्रशासकाची धुरा सीईओ अजित पवारांकडे, 21 मार्चपासून संभाळणार प्रशासकाची जबाबदारी तर उद्यापासून पंचायत समित्यांचा कारभार प्रशासकाची हाती



ुबीड, दि. 12 : राज्यभरातील जिल्हापरिषद आणि पंचायत समित्यांची मुदत या महिण्यात संपत आहे. तसेच या संस्थांच्या निवडणूक किमान सहा महिने तरी घेणे शक्य नसल्याचे चित्र असल्याने आता जिल्हापरिषद आणि पंचायत समित्यांवर प्रशासक नेमण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची मुदत संपताच जिल्हापरिषदेचे सारी सूत्रे मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे तर पंचायत समित्यांची सूत्रे गटविकास अधिकार्‍यांकडे दिली जाणार आहेत. हेच अधिकारी आता प्रशासकाची भूमिका निभावणार आहेत. त्यानुसार बीड जिल्हा परिषदेची पुर्णपणे धुरा सीईओ अजित पवारांकडे येणार आहे. बीड जिल्हापरिषदेची मुदत 20 मार्चला संपत आहे, तर जिल्ह्यातील पंचायत समित्यांची मुदत उद्या म्हणजे 13 मार्चला संपत आहे. त्यामुळे पंचायत समित्यांवर सोमवारपासून तर जिल्हापरिषदेवर पुढील सोमवारी (दि. 21 मार्च ) प्रशासक येईल. दरम्यान एक उत्तम प्रशासक म्हणून अजित पवार बीड जिल्हा परिषदेचा कारभार पहातील असा विश्‍वास सर्वांना आहे.

Exit mobile version