Site icon लोकाशा-बंब न्यूज

चाळीस हजाराची लाच घेताना पोलिस उपनिरीक्षकाला पकडले, पाटोद्यात एसीबीची कारवाई


बीड, दि. 11 (लोकाशा न्यूज) : तक्रारदाराचा गुन्ह्यात जप्त केलेला मोबाईल, तसेच आरोपीस अटकपूर्व जामीनासाठी सहकार्य करण्यासाठी पाटोदा पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकाने 50 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडअंती 40 हजार रुपयांची स्विकारण्याचे पंचासमक्ष मान्य केले. या प्रकरणी उपनिरीक्षकावर पाटोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि.11) बीड एसीबीने केली.

अफरोज तैमीरखा पठान हे पाटोदा पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांनी तक्रारदाराकडे गुन्ह्यातील मोबाईल परत देण्यासाठी व तक्रादाराच्या भावास अटक पुर्व जामीन मंजुर झालेली रद्द न करण्यासाठी, जप्त गाडी व पिस्टल सोडविण्यासाठी अहवाल चांगला देण्यासाठी 50 हजार रुपये लाचेची मागणी केली. व तडजोडीअंती चाळीस हजार रुपये स्वीकारण्याचे पंचासमक्ष व साक्षीदारांच्या समक्ष मान्य केले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राहुल खाडे, अप्पर पोलीस अधीक्षक विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली बीडचे उपअधीक्षक शंकर शिंदे, सुरेश सांगळे, हणुमान गोरे, संतोष राठोड यांनी केली. या कारवाईने खळबळ उडाली आहे.
Exit mobile version