अंबाजोगाई:-अंबाजोगाई तालुक्यातील मौजे साकुड येथे तरुणांचा गळा दाबुन व तिक्षणवार करून कोणीतरी अज्ञात व्यक्तीने खुन?केल्याची घटना उघडकीस आली आहे.
संध्याकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान तालुक्यातील मौजे साकुड गावाच्या पुढे आडबाजुच्या शेतात दोन दिवसापूर्वी कोणीतरी अज्ञातानी दिपक रामकिशन दगडे वय चाळीस वर्षे रा.टाकळी शिराढोन जिल्हा लातूर याचा कोणीतरी मृत्यू अगोदर गळा दाबून व नंतर तिक्षण? वार करुन खुन केल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडालीआहे. सदरील तरुणाचा मृतदेहाचा दुर्गंध सुटला असुन अळया देखील पडल्या आहेत.अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांना घटने माहिती मिळताच घटनास्थळी पोहचुन मृतदेह शवविच्छेदनासाठी स्वाराती रुग्णालयात पाठवला असल्याची माहितीपोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांनी म्हटले आहे. नातेवाईकांना कळवण्यात आले असुन तक्रारारी नंतर गुन्हा दाखल होईल.
अंबाजोगाई तालुक्यातील साकुड गावात तरुणांचा खुन?
