Site icon लोकाशा-बंब न्यूज

आ.संदीप क्षीरसागर यांच्या पुढाकारातून बीडमध्ये हरभरा खरेदी केंद्र सुरु, शेतकऱ्यांना दिलासा


बीड (प्रतिनिधी):- आ.संदीप भैय्या क्षीरसागर यांच्या पुढाकारातून बीड शहरातील कुर्ला रोडवरील बहिरवाडीमध्ये मंगळवारी (दि.८) शेतकऱ्यांसाठी शासकीय हरभरा खरेदी केंद्र सुरु झाले आहे. याचा बीड तालुक्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन बहिरवाडीचे सरपंच बाजीराव बोबडे यांनी केले.
बीड शहरात आ. संदीप भैय्या क्षीरसागर यांच्या पुढाकारातून पहिले शासकीय हमी भाव केंद्र सुरु झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. बहिरवाडीचे सरपंच बाजीराव बोबडे, यांच्या हस्ते या खरेदी केंद्राचे उदघाटन करण्यात आले. यावेळी एफसीआयचे डिव्हीजनल मॅनेजर राजेश जनबंधू, मॅनेजर शेळके, राठोड, जिल्हा पणन अधिकारी श्री.कापुरे यांची उपस्थिती होती. दरम्यान गहू, ज्वारी पाठोपाठ हरभरा हे प्रमुख पीक असून शासकीय खरेदी केंद्र बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना आपला माल विकताना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत होते. मात्र आता हरभरा खरेदीचे शासकीय हमीभाव केंद्र सुरु झाले असून ५२३० रुपये भाव देण्यात येत आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपला हरभरा विक्रीसाठी शासकीय हमीभाव केंद्रावर आणावा असे आवाहन बहिरवाडीचे सरपंच बाजीराव बोबडे यांनी केले.

चौकट
अशी करा ऑनलाईन नोंदणी
ऑनलाईन पद्धतीने शेतकऱ्यांची नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांचे आधारकार्ड, चालू वर्षातील पीक पेऱ्यासह ऑनलाईन सात-बारा, आयएफसी कोड व नाव दिसेल अशी बॅंक पासबुक प्रत आदींची प्रामुख्याने गरज राहणार आहे.

Exit mobile version