Site icon लोकाशा-बंब न्यूज

तीन लाख रूपयांसाठी विवाहितेचा छळ,
बीड ग्रामीण ठाण्यात पती, सासूसह चौघांवर
गुन्हा दाखल


बीड
बीड, दि. 6 (लोकाशा न्यूज) : प्लॉट घेण्यासाठी माहेराहून तीन लाख रूपये आण, असे म्हणत शारिरीक आणि मानसिक त्रास देवून येथील एका विवाहितेचा छळ केला जात आहे. याबाबत सदर विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून पती, सासू आणि दोन नणंदांवर बीड ग्रामीण ठाण्यात कलम 498 भादविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेश बाबासाहेब खांबकर, विमल खांबकर (सासू), सारिका खांबकर (नणंद) आणि सरिता खांबकर (नणंद) अशी आरोपींची नावे आहेत. 30 मे 2017 रोजी उमद जहाँगिर (ता.बीड) येथील अनिताचा विवाह बीडच्या कबाडगल्लीमधील गणेश खांबकर याच्याशी झाला, गणेश हा येथील पायल साडीच्या दुकानात कामगार आहे. मागच्या अनेक दिवसांपासून तो त्याच्या पत्नीचा तीन लाख रूपयांसाठी छळ करत आहे. त्याला प्लॉट घेण्यासाठी तीन लाख रूपये असून विवाहितेचा छळ करण्यासाठी त्याला त्याची आई आणि दोन बहिणी मदत करत आहेत. या छळालाच सदर विवाहिता त्रस्त झालेली आहे, त्यामुळेच तिने थेट बीड ग्रामीण ठाणे गाठून तक्रार दिली आहे. त्यानुसार आरोपी गणेश खांबकर, विमल खांबकर, सारिका आणि सरिता या दोघींविरोधात कलम 498 भादविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा अधिक तपास पोलिस निरीक्षक संतोष साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.

Exit mobile version