राक्षसभुवन दि लोकाशा न्युज बीडचे तहसिलदार व त्यांच्या सोबत अन्य दोनजन हे अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाहनावर कार्यवाई करण्यासाठी गेले असता सावळेश्वर जवळ त्यांच्या गाडीला वाळूच्या हायवाने गाडीला धडक दिली व या अपघातात पिंपळनेरचे मंडळ अधिकारी यांचा मृत्यू झाला असुन तहसिलदार गंभीर जखमी झाले आहेत . या बाबद सविस्तर माहिती अशी की , अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती बीड महसुल पथकाला मिळाली होती त्यावरून बीडचे तहसिलदार डोपे व मंडळ अधिकारी नितीन जाधव व अन्य एकजन यांनी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या दरम्यान सावळेश्वर परिसरात त्याच्या गाडीला एका वाळुच्या गाडीने त्यांच्या गाडीला कट मारला व महसुल पथकाच्या गाडी झाडाला आदळून हा अपघात झाला असल्याची माहिती आहे या अपघातात मंडळ अधिकारी नितीन जाधव यांचा मृत्यू झाला व अन्य दोनजन गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्यावर बीड येथील खाजगी रूग्णलयात उपचार सुरू आहेत
अवैध वाळू उपश्यावर कारवाईसाठी गेलेल्या महसुल पथकांच्या गाडीचा अपघात, अपघातात मंडळ अधिकारी नितीन जाधव यांच्या मृत्यू तर बीडचे तहसीलदार जखमी
