Site icon लोकाशा-बंब न्यूज

बीडमधील कर्तृत्ववान महिलांचा ‘नारी शक्ती’ पुरस्काराने होणार गौरव

बीड, दि. 4 (प्रतिनिधी) – अल्पवधीत बीड शहरात बालक-पालकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या बन्सल क्लासेस (कोटा) शाखा बीड आणि सौ. के एस के महाविद्यालयाच्या वतीने दि. 8 मार्च रोजी सायं 5.00 वाजता जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने गौरव नारी शक्तीचा या कार्यक्रमाचे आयोजन सौ. के एस के महाविद्यालय सभागृह, बीड येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमात बीडमधील विविध क्षेत्रात आपल्या कार्याने समाजासमोर आदर्श निर्माण करणाऱ्या कर्तुत्वान महिलांचा ‘नारी शक्ती’ पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे तर याचबरोबर नृत्यकलाविष्कार आणि भव्य दिव्य फॅशन शो स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सौ. के एस के महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. दीपा क्षीरसागर आणि बन्सल क्लासेसच्या संचालिका डॉ सारिका क्षीरसागर यांनी दिली आहे.

दि. 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनाचे अवचित्त साधून भव्य दिव्य फॅशन शो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत केवळ २० स्पर्धकांना प्रवेश देण्यात येणार असून या स्पर्धेत ३ विजेत्यांना क्राऊन (ताज) व रोख रक्कमेसह पारितोषिके देण्यात येणार आहेत तर सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. या फॅशन शो स्पर्धेसाठी सहभागी घेऊ इच्छित असणाऱ्या स्पर्धकांनी दि. ७ मार्च पर्यंत आपल्या नावाची नोंदणी ९२६०४७४७४७, ९५११७९८५५५ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून करणे अत्यावश्यक आहे.  याचबरोबर यंदाच्या शिवजयंतीमध्ये घेण्यात आलेल्या रील, रांगोळी अशा विविध स्पर्धेचे बक्षीस वितररण देखील करण्यात येणार आहे. प्राचार्या डॉ. दीपा क्षीरसागर आणि डॉ सारिका क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडत असून बीडमधील जास्तीत जास्त महिलांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Exit mobile version