Site icon लोकाशा-बंब न्यूज

ऊस गाळपास उशीर झाल्याने वजन घटले, उपजिल्हाधिकार्‍यांना ऊसाची मोळी देत आ.नमिता मुंदडांनी केली नुकसान भरपाईची मागणी

अंबाजोगाई -: शेतकर्‍यांच्या ऊस गाळपासाठी बारा महिन्यांपेक्षा ज्यास्त कालावधी लोटला. परिणामी ऊसाच्या वजनामध्ये तीस टक्क्यांपेक्षा ज्यास्त घट झाली. या तफावतीमुळे झालेल्या नुकसानीची रक्कम शेतकर्‍यांना तात्काळ द्यावी. या मागणीसाठी भाजपाच्या आ.नमिता अक्षय मुंदडा यांनी उपजिल्हाधिकारी यांना ऊसाची मोळी देत नुकसान भरपाईची मागणी केली. हे आंदोलन बुधवारी सकाळी उपजिल्हाधिकारी कार्यालय परिसरात झाले.
साखर कारखान्यांनी शेतकर्‍यांचा ऊस गाळपासाठी नेण्यास बारा महिन्यापेक्षा जास्त कालावधी लावला. यामुळे ऊसाचे वजन तीस टक्यांपेक्षा जास्त प्रमाणात घटले. यामुळे शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अजूनही साखर कारखाना क्षेत्रातील ऊस मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यांच्या शेतात उभा आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. हा ऊस गाळपासाठी तात्काळ न्यावा. शासनाने शेतकर्‍यांच्या झालेल्या तीस टक्के नुकसानीची नुकसान भरपाई शेतकर्‍यांना तात्काळ द्यावी. तसेच साखर कारखाना कार्यक्षेत्रात ऊस मोठ्या प्रमाणात शिल्लक असताना बाहेरील ऊस गाळपासाठी आणू नये. यासाठी कारखान्यांना प्रशासनाने लेखी सुचना द्याव्यात. शेतकर्‍यांनी ज्या साखर कारखान्याकडे ऊसाची नोंद केली आहे. तो ऊस त्याच साखर कारखान्याने घेवून जावा. सभासद व बिगर सभासद असा भेदभाव न करता शेतकर्‍यांचा सरसकट ऊस घेवून जावा. या विविध मागण्यांसाठी बुधवारी उपजिल्हाधिकारी कार्यालया समोर आंदोलन केले. यावेळी उपजिल्हाधिकारी यांना ऊसाची मोळी देत शेतकर्‍यांच्या विविध समस्या त्यांनी मांडल्या.या वेळी विविध मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना पाठविण्यात आले.
या आंदोलनात आ.नमिता मुंदडा, भाजपाचे ज्येष्ठनेते नंदकिशोर मुंदडा, भाजपाचे युवा नेते अक्षय मुंदडा, भाजपाचे तालुकाध्यक्ष अच्युत गंगणे, भाजपाचे उप जिल्हाउपाध्यक्ष सुनिल लोमटे, मधुकर काचगुंडे, प्रताप आपेट, हिंदुलाल काकडे, गणेश कराड, महादु मस्के, अ‍ॅड.संतोष लोमटे, आनंत लोमटे, सारंग पुजारी, वैजनाथ देशमुख, प्रशांत आदनाक, राजाभाऊ सोमवंशी, अमोल पवार, गोपाळ मस्के, प्रकाश बोरगावकर, शिरीष मुकडे महेश आंबाड यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते.

Exit mobile version