अंबाजोगाई : तालुक्यातील बागझरी येथील काशीनाथ दत्तू धारासुरे यांच्या कुटुंबातील ३ बालकांसह पत्नी अशा चार सदस्यांना विषबाधा झाल्याची घटना शनिवारी (दि.२६) सकाळी उघडकीस आली. यात तीन बालकांचा सकाळी दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर उपचार दरम्यान रात्री नऊच्या दरम्यान आईचाही मृत्यू झाला आहे.
साधना (वय ६), श्रावणी (वय ४), नारायण (८ महिने) या तिघांचा सकाळी मृत झाले तर भाग्यश्री (वय २८) यांच्यावर उपचार सुरू होते मात्र रात्री 9 च्या दरम्यान भाग्यश्रीचेही मृत्यू झाले. शुक्रवारी (दि.२५) रात्रीच्या जेवणानंतर ही विषबाधा झाली असल्याचा संशय काशीनाथ धारासुरे यांनी व्यक्त केला. परंतु, नेमका मृत्यू कशामुळे झाला हे शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे.
उपचार दरम्यान आईचाही मृत्यू; बागझरी येथील घटना
