Site icon लोकाशा-बंब न्यूज

परळीत चाकूचे वार करून महिलेची हत्या, मुलगी गंभीर

परळी – शहराजवळच आयेशा नगर येथे एका ५० वर्षीय महिलेची चाकूने सपासप वार करून हत्या करण्यात आली तर या हल्ल्यात त्या महिलेची १६ वर्षीय मुलगी देखील जखमी झाल्याची घटना शनिवारी (दि.२६) दुपारी समोर आली. मयत महिलेचे नाव शेख मदिना शेख मंजीद आणि मुलीचे नाव मुस्कान असल्याचे समजते. भर दिवसा झालेल्या या घटनेने परळी शहरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, हा हल्ला आर्थिक व्यवहारातून झाली असावा असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. संशयित हल्लेखोर तरुण माजलगाव तालुक्यातील असल्याची प्राथमिक माहिती सूत्रांनी दिली.

Exit mobile version