Site icon लोकाशा-बंब न्यूज

बीडमध्ये शिवसेना आक्रमक, दाखल
झालेला गुन्हा रद्द करण्याची मागणी


बीड, दि. 26 ः रजिस्ट्री कार्यालयात झालेल्या गोळीबार प्ररणात डॉ. भारतभुषण क्षीरसागर व इतरांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत यासाठी शनिवारी शिवसेना आक्रमक झाली. डॉ. सारिका क्षीरसागर यांच्यासह सेनेच्या पदाधिकार्‍यांनी बीडमध्ये पायी आंदोलन करत जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला निवेदन दिले आहे. बीड शहराचे माजी नगराध्यक्ष डॉ. भारतभुषण क्षीरसागर आणि इतरांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीसांनी कोणतिही खातरजमा न करता गुन्हे दाखल केले आहेत ते मागे घ्यावेत अशी मागणी डॉ. सारीका क्षीरसागर, अनील जगताप, सचिन मुळूक, बाळासाहेब पिंगळे, विलास विधाते, गणपत डोईफोडे, महेश धांडे आदिंनी केली आहे.

Exit mobile version