Site icon लोकाशा-बंब न्यूज

विषबाधेमुळे अंबाजोगाईत दोन
मुलींचा मृत्यू; आई, भाऊ चिंताजनक


अंबाजोगाई – शहरातील नागझरी परिसरात राहणारे काशीनाथ दत्तू धारासुरे यांच्या दोन मुली साधना (वय 6) आणि श्रावणी (वय 4) यांचा विषबाधेने मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि.26) सकाळी घडली. तर, पत्नी भाग्यश्री (वय 28) आणि मुलगा नारायण (वय 8 महिने) यांची प्रकृती चिंताजनक आहे. शुक्रवारी (दि.25) रात्रीच्या जेवणानंतर ही विषबाधा झाली असल्याचा संशय काशीनाथ धारासुरे यांनी व्यक्त केला.

Exit mobile version