Site icon लोकाशा-बंब न्यूज

पंकज कुमावतांचा दणका, पथकाने आष्टीतील कत्तलखान्यावर मारली धाड, 13 लाखाचा मुद्देमाल जप्त, 11 आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल


बीड, दिनांक 23/02/2022 रोजी मा पोलीस अधीक्षक साहेब बीड यांना माहिती मिळाली की दौला वडगाव तालुका आष्टी येथील येथील इसम नामे खलील अरुण कुरेशी व दलील हरून कुरेशी हे आपले स्वतःचे फायद्याकरता विनापरवाना बेकायदेशीररित्या दौलावडगाव शिवारात डोंगराच्या पायथ्याला पत्र्याचे शेड मध्ये कत्तलखाना तयार करून त्यात बैल व गाईची जनावरांची कत्तल करून तयार केलेले मास टेम्पोमध्ये भरून तो मुंबई येथे विक्रीसाठी पाठवत आहे अशी माहिती मिळाल्यावरून सदरची माहिती मा सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावात साहेब यांना कळविल्याने सहा पोलीस अधीक्षक श्री पंकज कुमावत साहेब यांनी मा. पोलीस अधीक्षक साहेब बीड यांचे मार्गदर्शनाखाली ठाणे केजी तील सपोनि मिसळे व त्यांचे उपविभागीय कार्यालयाचे पोलीस आमलदार यांना पंचा सह सदर बातमीचे ठिकाणी पाठवून पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सदर ठिकाणी जाऊन दिनाक 24/02/2022 रोजी 00.30 वाजता छापा मारला असता सदर ठिकाणी जनावरांची कत्तल करताना जागीच मिळून आले व व तीन इसम आम्हास पाहून पळून गेले मिळालेला इसमांना ताब्यात घेऊन पंचांसमक्ष पत्र्याच्या शेड ची व शेड समोर असलेल्या आयशर टेम्पो क्रमांक MH 23 W 3983 पाहणी केली असता टेम्पोत व शेडमध्ये 40 जनावरांची कत्तल करून तयार केलेले मास पाच टन किमती 620000 टेम्पो किंमत 400000 व मुजरा साठी येणे जाण्यासाठी लागणारी टोयोटा कंपनीची ईटॉस कार क्रमांकMH 20 कस 8080 किमती 300000 असा एकूण 13 लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आल्याने पंचा समक्ष घटनास्थळ मिळून आलेल्या इसमांना सदर कत्तलखान्याच्या मालका बाबत विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की खालील हारून कुरेशी कुरेशी यांचा असून त्यांच्या सांगण्यावरून आम्ही जनावरे कापून टेम्पोमध्ये भरून देत आहोत असे सांगितले म्हणून पंचनामे तेच पंचांसमक्ष समक्ष घटनास्थळावर मिळून आलेले मास कंसात मटन टेम्पो tito’s गाडी गॅस बत्ती पाण्याचे टॅंक सत्तुर चाकू सुरा जप्त करून पशुवैद्यकीय अधिकारी यांना बोलावून घेऊन त्यांच्या कडून सदर मासाचे सीएसाठी सॅम्पल घेऊन एकूण 11 आरोपीविरुद्ध पोलीस ठाणे अंभोरा येथे गुन्हा दाखल केला आहे सदरची कारवाई
मा. पोलीस अधीक्षक साहेब बीड
मा. अप्पर पोलीस अधीक्षक साहेब बीड
सहाय्यक पोलिस अधिक्षक मा पंकज कुमावत साहेब यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे केज येथील सपोनि संतोष मीसळे उपविभागीय कार्यालय केज येथील पोलीस आमदार बालाजी दराडे सुहास जाधव राजू वंजारे सचिन अंहकारे संजय टूले पोलीस ठाणे अंभोरा येथील पोउपनी रवी देशमाने आदिनाथभडके व पोलीस आमलदार यांनी केली आहे.

Exit mobile version