Site icon लोकाशा-बंब न्यूज

..हे तर भाजपचे सुडबुध्दीने राजकारण,
एनसीपीच्या अ‍ॅड. प्रज्ञा खोसरेंची टिका,
जनता भाजपला माफ करणार नाही


बीड, दि. 23 (लोकाशा न्यूज) : राज्याचे मंत्री नबाव मलिक यांना अटक केल्यानंतर महाराष्ट्रातून भाजपचा तिव्र निषेध केला जात आहे. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या नेत्या अ‍ॅड प्रज्ञा खोसरे यांनीही भाजपवर जोरदार टिका केली आहे. हे तर भाजपचे सुडबुध्दीने राजकारण असून जनता त्यांना कदापी माफ करणार नसल्याची टिका अ‍ॅड खोसरे यांनी केली आहे.
राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरूनही भाजपला सत्ता मिळाली नाही, त्यामुळेच भाजपचे नेते केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत आहेत. तपास यंत्रणांकडून सुरू असलेला गैरवापर संपूर्ण देश, महाराष्ट्र आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. असेच बिनबुडाचे आरोप करून मंगळवारी पहाटेच्या सुमारास ईडीच्या पथकाने राज्याचे मंत्री नबाव मलिक यांच्या घरी जावून मलिक यांना चौकशीसाठी कार्यालयात आणले, याठिकाणी चौकशी करून त्यांना अटक करण्यात आली, अशा राजकारणामुळे महाराष्ट्रात सर्वत्र भाजपची थू-थू होत आहे. याच प्रकरणावरून राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या नेत्या अ‍ॅड प्रज्ञा खोसरे यांनीही तिव्र शब्दात टिका केली आहे. सत्ता हातातून गेल्यामुळे भाजप फक्त आणि फक्त सूडबुद्धीने राजकारण करत आहे, तुम्ही कितीही ईडी मागे लावल्या तरीही सत्य हे सत्यच असत, अशा शब्दात अ‍ॅड खोसरेंनी भाजपवर टिका केली आहे.

Exit mobile version