Site icon लोकाशा-बंब न्यूज

पुन्हा वैद्यकीय व्यवसाय थाटणे भोवले, डॉ. सुदाम मुंडेला चार वर्षे सक्त मजुरीची शिक्षा, अंबाजोगाई न्यायालयाचा निकाल

अंबाजोगाई प्रतिनिधी-

शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी अंबाजोगाई न्यायल्याने आरोपी डॉ सुदाम मुंडे यास चार वर्षे सक्त मजुरी आणि दंड ठोटावला आहे.

अवैध गर्भपात प्रकरणातील आरोपी डॉ . सुदाम मुंडे यास औरंगाबाद उच्च न्यायालयाने वैद्यकीय व्यवसाय न करण्याच्या अटीवर जामीन दिला होता . या आदेशाचे उल्लंघन करून डॉ . मुंडे यांनी वैद्यकीय व्यवसाय थाटला . त्यामुळे कारवाई करण्यासाठी गेलेल्या जिल्हा शल्यचिकित्सक डॉ . अशोक थोरात यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा आणला व उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी परळी शहर ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता . हे प्रकरण ( क्र .५५ / २०२० ) अंबाजोगाई अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे दुसरे सत्र न्यायाधीश व्ही . के . मांडे यांच्यासमोर चालले . डॉ . सुदाम मुंडे यास कलम ३५३ भादवी अन्वये चार वर्ष शिक्षा व व दोन हजार रुपये दंड , कलम ३३ ( २ ) मेडिकल कायद्याने तीन वर्षे शिक्षा व कलम १५ ( २ ) इंडियन मेडीकल कौन्सील कायद्यान्वये एक वर्ष सक्तमजरीची शिक्षा ठोठावण्यात आली .

Exit mobile version