Site icon लोकाशा-बंब न्यूज

जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे अनुदान तात्काळ वाटप करा – शर्मा, अनुदानाचे 142 कोटी 31 लाख चार हजार रूपये कलेक्टरांनी तातडीने तहसिल कार्यालयाला केले वर्ग


बीड, दि. 21 (लोकाशा न्यूज) : या वर्षीच्या खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले होते, त्यानुसार जिल्ह्यातील शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देण्यात येत आहे. अनुदानाचा पहिला टप्पा वाटप करण्यात आलेला आहे. तर दुसर्‍या टप्प्यातील अनुदानाचे 142 कोटी 31 लाख चार हजार रूपये जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी सोमवारी तातडीने जिल्ह्यातील सर्व तहसिल कार्यालयांना वर्ग केले आहे. अनुदानाचे हे 142 कोटी तात्काळ शेतकर्‍यांच्या खात्यात वर्ग करावेत, असे आदेशही जिल्हाधिकार्‍यांनी तहसिलदारांना दिले आहेत.
यंदाच्या खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे बीड जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले होते, अशा परिस्थितीमध्ये जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले, त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळेच शेतकर्‍यांना सुरूवातीला अ‍ॅग्रीमची 25 टक्के रक्कम त्यांच्या खात्यात आली, त्यानंतर त्यांनी अनुदानासंदर्भातही चांगला निर्णय घेवून अनुदानासाठी लागणारा निधीची मागणीही केली. यादरम्यानच्या काळातच राज्य सरकारने अनुदान दोन टप्प्यात वाटप करण्याचा निर्णय घेतला, त्यानुसार पहिल्या टप्प्यातील अनुदान वाटप करण्यात आलेले आहे. तर आता राज्य सरकारने अनुदानाचे दुसर्‍या टप्प्यातील 142 कोटी 31 लाख चार हजार रूपये राज्य सरकारकडून जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाले, प्राप्त अनुदानाची ही सगळी रक्कम जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी सोमवारी तातडीने जिल्ह्यातील सर्व तहसिल कार्यालयांना वर्ग केले आहेत. त्यानुसार वर्ग केलेले हे अनुदान तात्काळ शेतकर्‍यांच्या खात्यात जमा करावे, असे आदेशही जिल्हाधिकार्‍यांनी सर्व तहसिलदारांना दिले आहेत.

तालुक्यांना वर्ग केलेले अनुदान
तालुका वितरीत केलेले अनुदान
बीड 185778065
गेवराई 205966993
शिरूर 82539799
आष्टी 132177668
पाटोदा 100122525
माजलगाव 122849011
धारूर 79632571
वडवणी 50017500
केज 209394650
अंबाजोगाई 134744918
परळी 119880300

एकूण 1423104000

Exit mobile version