Site icon लोकाशा-बंब न्यूज

माजी नगराध्यक्ष रणजितसिंह चौहान यांचे निधन


बीड, दि. 21 (लोकाशा न्यूज) : नगर पालिकेचे माजी नगराध्यक्ष रणजितसिंह चौहान यांचे सोमवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर पुणे येथे उपचार सुरू होते. बीड नगर पालिकेत आपल्या कार्यकर्तृत्वामुळे वेगळा ठसा उमटवणारे म्हणून त्यांची कारकीर्द लक्षात राहणारी आहे. नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर यांचे निकटवर्तीय म्हणून ते परिचित होते. दीर्घकाळ नगरसेवक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. बीड शहरातील सामाजिक, राजकीय क्षेत्रात त्यांचे मोलाचे योगदान होते. बीडचे ग्रामदैवत खंडेश्वरी देवी आणि कंकलेश्वर मंदिरचे ते ट्रस्टी होते. पेठ बीड भागाच्या विकासात त्यांचे मोठे योगदान होते. मंगळवारी दुपारी तीन वाजता अमरधाम स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुल, एक मुलगी, जावाई असा मोठा परिवार आहे. चौहान कुटूंबियांच्या दुखात दै. लोकाशा व बंब परिवार सहभागी आहे.

Exit mobile version