माजलगाव, दि. 18 (लोकाशा न्यूज) : तालुक्यातील सुर्डी येथील पुरुषोत्तम घाटुळ यास बालीकेवर अत्याचार केल्या प्रकरणी दोषी ठरवून येथील अप्पर सत्र न्यायाधीश संतोष.पी . देशमुख यांनी शुक्रवार रोजी आजन्म कारावासासह 26 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
पिडीत फिर्यादी साडेआठ वर्षाची मुलगी ही लहान असल्याने तिचे मैत्रिणीकडे दि.13 जुलै 21 रोजी नेहमी प्रमाणे खेळण्यास गेली असताना मैञिनिच्या काकाने तीचे पुतनीस काम सांगुन घराचे बाहेर पाठवले. व पिडीतेस एकटी पाहुन लैंगिक अत्याचार केला. व पिडीतेला जर कोणाला सागशील तर जिवे मारण्याची धमकी दिली. पिडीतेने सदर प्रकार आईला सांगितल्याने तीच्या आई,वडीलांसह नातेवाईकांनी थेट माजलगाव ग्रामिण पोलीस स्टेशन गाठून या बाबत तक्रार दाखल केली. महीला पोलीस अधिकारी एपीआय निता गायकवाड यांनी तात्काळ घटनास्थळी जावून आरोपीस अटक करुन सदरील प्रकरणामध्ये पिडीतेच्या आईची तक्रार, पिडीतेचा जबाब, तिचा वडीलांचा आजोबाचा जबाब, तिची वैद्यकिय तपासणी, तिचे जन्माचे प्रमाणपत्र हस्तगत केले व एसडीपीओ सुरेश पाटील यांनी आरोपी विरुद्ध दोषारोप पत्र माजलगाव येथील सत्र न्यायालयात दाखल केले. या प्रकरणात फिर्यादीच्या विनंतीवरून बीड येथील त्यावेळेचे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील यांनी या प्रकरणात फिर्यादी, पिडीता माजलगांव येथील खाजगी रुग्नालयातील डॉक्टर, एस.आर.टी.आर कॉलेज अंबाजोगाई येथील महिला वैद्यकीय अधिकारी तसेच माजलगाव येथील वैद्यकीय अधिकारी पिडीतेचे आजोबा प्रथम तपासी अधिकारी निता गायकवाड,एस.डी.पी.ओ.सुरेश पाटील या सर्वाचे जबाब नोंदवून घेतले. आरोपीच्या वतीने दोन बचावाचे साक्षीदार त्याची आई व पुतणी तिचा जबाब नोंदवला सरकार पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील अॅड. मिलींद वाघीरकर यांनी युक्तीवाद सादर केला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश संतोष. पी. देशमुख यांनी आरोपीला दोषी धरून कलम 376 ( अ ) ( ब ) 506 भा.द.वी. तसेच कलम 5 ( एम ) सह 6 , 9 ( एम ) , सह 10 या विविध कलमाअंतर्गत दोषी ठरविले. मुख्य कलम 6 बाल लैंगिक अत्याचार 2012 व त्यामध्ये 2019 मध्ये आलेल्या शिक्षेच्या नवीन तरतुदीनुसार आरोपीला अजन्म कारावासाची शिक्षेसह 26 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून पुर्वीचे बीड येथील अतिरिक्त जिल्हा सरकारी अभियोक्ता अँड मिलींद केशवराव वाघीरकर तसेच त्यांना सहकार्य सहाय्यक सरकारी अभियोक्ता अँड . रणजित ए वाघमारे यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली.