Site icon लोकाशा-बंब न्यूज

चार तालुक्यांतील प्रश्‍न सोडविण्यासाठी रमेश आडसकर केंद्रीय अर्थ राज्य मंत्री कराडांना भेटले, बाजारपेठांच्या गावात राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखा उघडणार, दिल्लीत आडसकर अन् कराडांमध्ये झाली सकारात्मक चर्चा


बीड, दि. 11 (लोकाशा न्यूज) : शेतकरी, व्यापारी तसेच सर्वसामान्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी आडसकर कुटूंबिय नेहमीच पुढे येते. त्यामुळेच बीड जिल्ह्यात रमेश आडसकरांचा दबदबा आहे. असाच महत्वाचा चार तालुक्यातील एक प्रश्‍न घेवून रमेश आडसकर दिल्लीत केंद्रीय अर्थ राज्य मंत्री भागवत कराडांना भेटले आहेत. शेतकर्‍यांसह छोटे व्यापारी व व्यवसायिकांच्या हितासाठी आणि आर्थिक व्यवहारांना मदत व्हावी, यासाठी बाजारपेठांच्या गावांमध्ये राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखा उघडाव्यात, अशी मागणी आडसकरांनी कराडांकडे केली आहे. त्या दोघात सकारात्मक चर्चा झाली असून सदर प्रश्‍न लवकरच मार्गी लागणार आहे.

श्री. आडसकर यांनी गुरूवारी नवी दिल्ली येथे श्री.कराड यांची भेट घेतली. दोन महिण्यांपुर्वी औरंगाबाद येथील एका मेळाव्यात रमेश आडसकर यांनी भागवत कराड यांच्याकडे सदरील मागणी केली होती. त्यानंतर त्यांनी दिल्लीला येण्याबाबत सांगितले होते. यानुसार गुरूवारी रमेशराव आडसकर यांनी दिल्लीत जावून सर्व तांत्रिक बाबी व गरजांच्या माहितीचे पत्र दिले. आडस (ता.केज), गंगामसला, दिंद्रुड, पात्रूड (ता.माजलगाव), वडवणी व रूई (ता.धारूर) याठिकाणी राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखा उघडाव्यात, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. सदरील गावे व्यापारपेठांची आहेत, त्यामुळे परिसरातील गावांतील नागरिकांची रहदारी असते. आर्थिक व्यवहारासह केंद्र सरकारकडून येणार्‍या विविध अनुदानांसाठी बँक शाखांची गरज असल्याचे श्री. आडसकर यावेळी म्हणाले. त्यांच्या या मागणीला भागवत कराड यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे त्यांनी सांगितले.
Exit mobile version