Site icon लोकाशा-बंब न्यूज

२१ वर्षापासून फरार असलेला आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने पकडला


बीड, मा . विशेष पोलीस महानिरीक्षक , औरंगाबाद परिक्षेत्र , औरंगाबाद यांनी बीड जिल्हयाचे वार्षीक तपासणीचे दरम्यान पाहिजे व फरार आरोपीचा आढावा घेवून बीड जिल्हा अभिलेखावरील संख्या कमी करण्याबाबत सुचना दिलेल्या आहेत . त्याअनुषंगाने मा . पोलीस अधीक्षक , बीड यांनी जिल्हयातील सर्व पोलीस स्टेशन व स्था . गु.शा. यांना पाहिजे व फरार आरोपी अटक करणेबाबत सक्त सूचना दिल्या होत्या . त्याअनुषंगाने जिल्हयात पाहिजे व फरार आरोपीतांना अटक करण्याची विशेष मोहिम चालू आहे . दिनांक ० ९ / ०२ / २०२२ रोजी पोलीस निरीक्षक , स्थानिक गुन्हे शाखा , बीड यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की , आरोपी नामे दयानंद गुंडप्पा रा . लालवाडी जि.बिदर ( कर्नाटक राज्य ) हा बिदर येथे असल्याची माहिती मिळालेवरुन स्था.गु.शा .. चे एक पथक सदर ठिकाणी रवाना केले . सदर पथकाने लालवाडी बिदर , बसवकल्याण , हुमनाबाद , गुलबर्गा ( कर्नाटक राज्य ) येथे जावून आरोपीची माहिती काढली असता सदरील आरोपी हा लालवाडी बिदर येथे असल्याची माहिती मिळालेवरुन सदर ठिकाणी जावून , दिनांक १०/०२/२०२२ रोजी सापळा रचून आरोपी नामे दयानंद गुंडप्पा वय ५८ वर्षे रा . लालवाडी जि . बिदर ( कर्नाटक राज्य ) यास शिताफीने ताब्यात घेतले . सदरील आरोपीस पोलीस ठाणे , अंबाजोगाई शहर गु.र.नं. २४८ / १ ९९ ७ कलम ४८ ९ ( ब ) . ४८ ९ ( क ) . ४८ ९ ( ड ) , ४२० , २०१ , ३४ भादंवि गुन्हयात पुढील कार्यवाहीसाठी पोलीस ठाणे , अंबाजोगाई शहर येथे हजर केले आहे . सदरील आरोपी हा त्यास गुन्हयात शिक्षा झाल्यानंतर गेल्या ( २१ ) वर्षापासून फरार होता . तो त्याचे अस्तीत्व बदलून वेगवेगळया ठिकाणी राहात होता . त्याने अद्याप पावेतो पोलीसांना गुंगारा देवून तो फरार होता . सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे .

Exit mobile version