बीड/प्रतिनिधी
भारतीय संगीतात असलेल्या सप्तस्वरानाही आज अबोल व्हावे लागले गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे संपूर्ण देश निशब्द झाला आहे सात दशकांच्या संगीत कारकिर्दीत आपल्या आवाजाने रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या लता दीदींच्या निधनामुळे संगीत क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे शास्त्रीय संगीतापासून हिंदी चित्रपट संगीत भावगीत भक्तिगीत आणि मराठी चित्रपटातील अशात 30000 गीतांचा आपल्या गळ्यातून सुमधुर आवाज काढणारी एकमेव गानकोकिळा म्हणजेच लतादीदी होय त्यांनी गायलेली गीते ही अजरामर राहणार असून यापुढेही लता दीदींनि गायलेली गाणी रसिकांच्या हृदयात राहतील असे माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे