बीड, दि. 4 (लोकाशा न्यूज) : ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांनी खा. सुप्रियाताई आणि भाजपच्या नेत्या पंकजाताई मुंडे यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून संताप व्यक्त केला जात आहे. बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकारीही कराडकरांच्या विरोधात प्रचंड आक्रमक झाल्या आहेत. कराडकरांच्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे महिलांच्या आत्मसन्मानाला धक्का लागलेला आहे, त्यामुळे त्यांच्यावर पोलिसांनी तात्काळ कडक कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस तथा मराठवाडा समन्वयक सौ. प्रज्ञाताई खोसरे यांनी केली आहे. या संदर्भातच शुक्रवारी पदाधिकार्यांनी बीडचे पोलिस अधीक्षक राजा रामा स्वामी यांना एक लेखी निवेदनही दिले आहे.
बंडातात्या कराडकरांच्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे महिलांच्या आत्मसन्मानाला धक्का लागला – अॅड प्रज्ञा खोसरे, कराडकरांवर कडक कारवाई करा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकार्यांची एसपींकडे मागणी
