बीड, दि. 4 (लोकाशा न्यूज) : जिल्ह्याच्या खा. प्रीतमताई मुंडे यांनी शुक्रवारी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात किशोरवयीन मुलं अन् मुलींच्या लसीकरणावर प्रश्न उपस्थित केला, यावर केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी अतिशय चांगले आणि समाधानकारक उत्तर दिले, खा. मुंडेंच्या एका या प्रश्नामुळे किशोरवयीन मुलं अन् मुलींच्या लसीकरणाला चालना मिळणार आहे.
एकात्मिक बाल विकास योजनेच्या माध्यमातून लहान मुलं आणि किशोरवयीन लोकांच्या लसीकरणासाठी केंद्र सरकार अनेक योजना राबवित आहे. सद्यस्थितीत आपण कोरोना महामारीचा सामना करत आहोत, या परिस्थितीचा सामना करण्यासाठी पंधरा ते अठरा वयोगटातील लोकांचे लसीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. एकात्मिक बालविकास कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध योजना राबवत असताना किशोरवयीन मुलं आणि विशेषतः मुलींच्या कोविड लसीकरणाला चालना देण्यासाठी महिला व बालविकास विभाग आणि केंद्र सरकार काही मोहीम राबवित आहे का? असा प्रश्न शुक्रवारी खा. प्रीतमताई मुंडे यांनी लोकसभेत उपस्थित केला. त्यांच्या या प्रश्नाला केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी अतिशय चांगले आणि समाधानकारक उत्तर दिले, त्याबद्दल त्यांचे खा. मुंडेंनी आभार मानले.