Site icon लोकाशा-बंब न्यूज

विहिरीत उडी घेऊन सख्ख्या बहिणींची आत्महत्या, अंबाजोगाईतील घटना


अंबाजोगाई, दि. 4 (लोकाशा न्यूज) : शहरातील स्वाराती रुग्णालयाच्या रोडवरील कंपनी बागेतील विहिरीत बुडून दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता उघडकीस आली होती. मात्र त्या दोघींनी आत्महत्या केल्याचे रात्री उशीरा पोलीस तपासात समोर आले आहे.
   निदा अल्ताफ शेख (वय 16) आणि सानिया अल्ताफ शेख (वय 18) अशी त्या मृत बहिणींची नावे आहेत. निदा आणि सानिया फॉलोअर्स क्वार्टर भागात राहत होत्या. सकाळी वडील त्यांना मैत्रिणीच्या वाढदिवसासाठी मोरेवाडीला सोडून आले होते. दुपारी त्यांचा विहिरीतील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे समोर आले.  स्थानिकांच्या  मदतीने त्यांचे मृतदेह विहिरीच्या बाहेर काढून शवविच्छेदनासाठी स्वराती रूग्णालयात पाठविण्यात आले.  दरम्यान, त्या दोघींनी आत्महत्या केल्याचे रात्री स्पष्ट झाले असून कारण मात्र समजू शकले नाही. 

Exit mobile version