Site icon लोकाशा-बंब न्यूज

मुंबई ते आष्टी दरम्यान प्रवासी रेल्वे वाहतूक सुरू करा,खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांची मागणी,रेल्वे राज्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद

बीड । दि. ०२ ।
बीड जिल्हावासियांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा असलेला नगर-बीड-परळी रेल्वे प्रकल्प सध्या जलद गतीने पूर्णत्वाकडे जातो आहे.या प्रकल्पाचा नगर ते आष्टी दरम्यानच्या लोहमार्ग कामाचा टप्पा पूर्ण झाले असल्याने या मार्गावर मुंबई ते आष्टी दरम्यान प्रवासी रेल्वे वाहतूक सुरू करावी अशी मागणी खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे केली आहे.

गतवर्षी नगर ते आष्टी दरम्यानचा एकसष्ठ किमीच्या लोहमार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर खा.प्रितमताई मुंडे यांच्या उपस्थितीत नगर तर आष्टी दरम्यान रेल्वेची ट्रायल घेण्यात आली होती.हा रेल्वे मार्ग पूर्णपणे प्रवासी वाहतुकीस सज्ज असल्यामुळे मुंबई-नगर-आष्टी दरम्यान प्रवासी वाहतुक सुरू करण्याची मागणी सामान्य लोकांमधून होत आहे,जनसामान्यांच्या भावना आणि प्रवासी नागरीकांच्या मागणीची दखल घेऊन खा.प्रितमताई मुंडे यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन मुंबई ते आष्टी रेल्वेसेवा सुरू करण्याची मागणी केली आहे.

नगर-बीड-परळी रेल्वे मार्गातील नगर ते आष्टी दरम्यानचा पहिला टप्पा पूर्ण होणे प्रवासी वाहतुकीसाठी महत्वपूर्ण आहे,या मार्गावर लवकरात लवकर रेल्वेची प्रवासी वाहतूक सुरू करू अशी सकारात्मक प्रतिक्रिया रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी खा.प्रितमताई मुंडे यांच्या मागणीवर व्यक्त केली आहे, खा.प्रितमताई मुंडे यांचा पाठपुरावा आणि रेल्वे राज्यमंत्र्यांच्या प्रतिसादाने लवकरच मुंबई ते आष्टी रेल्वे सेवा सुरू होईल अशी अपेक्षा बीड जिल्ह्यातील नागरीकांमधून व्यक्त होते आहे.

••••

Exit mobile version