मुंबई । दिनांक ०१।
शेती, शिक्षण, तरूणाई, सहकार, महिला आणि आरोग्य क्षेत्राबरोबरच सर्व सामान्यांच्या सर्वांगीण विकासाचं हित साधणारा आजचा अर्थसंकल्प आहे अशा शब्दांत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी केंद्रीय अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे.
सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी हा अर्थसंकल्प मांडला आहे, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार पंकजाताई मुंडे यांनी मानले आहेत. शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणाऱ्या योजना, आर्थिक सहाय्य, प्रधानमंत्री आवास योजनेतून शहरी व ग्रामीण भागात घर बांधणी, तरूणांना व्यवसाय उभारणीसाठी नाबार्ड मधून अर्थसहाय्य, कृषी आधारित नव्या उद्योगांना कर्ज, महिलांसाठी वात्सल्य योजना, आरोग्य क्षेत्रासाठी भरीव तरतूद आदी ठळक वैशिष्ट्य आजच्या अर्थसंकल्पाची आहेत. हा अर्थसंकल्प सर्वसामान्य माणसाच्या हिताचा व कल्याणाचा आहे असं पंकजाताई मुंडे यांनी म्हटलं आहे.
••••