Site icon लोकाशा-बंब न्यूज

म्हाडाच्या परीक्षेच्या घोटाळ्यातही वडझरी पॅटर्न उघड, बीडमध्ये परीक्षा देण्यासाठी आलेला डमी विद्यार्थी परीक्षा केंद्रावर पकडला, महिला पोलीस कर्मचारी संगीता सिरसाट यांची कारवाई


बीड, म्हडाच्या परीक्षेच्या घोटाळ्यातही वडझरी पॅटर्न उघड झाला आहे,
बीडमध्ये परीक्षा देण्यासाठी आलेला डमी विध्यार्थी अर्जुन बिलाल बिघोट (औरंगाबाद) याला पकडले आहे, ही कारवाई एलसीबीच्या महिला पोलीस कर्मचारी संगीता सिरसाट यांनी केली आहे, बिघोट हा वडझरी येथील राहुल किसन सानप यांच्या नावाने शहरातील दिशा कॉम्प्युटर या सेंटरवर परीक्षा देण्यासाठी आला होता, मात्र त्याला परीक्षा देण्यापूर्वीच सिरसाट यांनी बेड्या ठोकल्या, सिरसाट यांनी केलेल्या या कारवाईमुळे घोटाळेबाजांचे धाबे दणाणले आहेत. याबाबत शिवाजी नगर ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.


Exit mobile version