Site icon लोकाशा-बंब न्यूज

बीड जिल्ह्याच्या विकासात पुन्हा मुंडे भगिणींचा डंका, परळी-सिरसाळ्यासह बीड जिल्ह्यात होणार 768 कोटींचे आणखी चार राष्ट्रीय महामार्ग; निविदा प्रसिद्ध, मुंडे भगिणींनी गडकरींचे मानले आभार, जिल्ह्याच्या विकासात पडणार मोठी भर


बीड, दि. 21 (लोकाशा न्यूज) : केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्रालयाने जिल्हयात चार राष्ट्रीय महामार्गासाठीची निविदा प्रसिद्ध केली आहे. परळी – सिरसाळासह चार रस्त्यांसाठी 768 कोटीची ही निविदा असून लवकरच महामार्गाच्या कामांना सुरवात होणार आहे. दरम्यान, राष्ट्रीय महामार्गामुळे जिल्हयाच्या विकासात मोठी भर पडणार आहे असं सांगत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी याबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले आहेत.
नॅशनल हायवेने गुरूवारी या कामांच्या निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. परळी ते सिरसाळा हा रस्ता राष्ट्रीय महामार्गात समाविष्ट असून तसाच तो पुढे बीड पर्यंत असणार आहे. पहिल्या टप्प्यात यासाठी 235 कोटीची तरतूद आहे. हा रस्ता चौपदरी होणार आहे. या रस्त्यासह जिल्हयातील ज्या चार महामार्गाची निविदा प्रसिद्ध झाली आहे, त्यात साबलखेड- आष्टी – चिंचपूर- जामखेड 212 कोटी 70 लाख, जामखेड ते सौताडा 136 कोटी, शिरापूर/नवगन राजुरी जंक्शन ते शिवाजी चौक बीड आणि बार्शी नाका ते जरूड फाटा 184 कोटी 76 लाख अशी एकूण 768 कोटी 46 लाखाची ही कामे आहेत. जिल्हयातील राष्ट्रीय महामार्गाच्या पूर्णत्वासाठी पंकजाताई मुंडे व खा.डॉ.प्रितमताई मुंडे हया सुरवातीपासून प्रयत्नशील आहेत, वेळोवेळी त्यांनी यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन पत्र देऊन पाठपुरावा केला होता, याच प्रयत्नांमुळे आता यासाठी निविदा निघाल्या आहेत. या कामांमुळे जिल्हयाच्या विकासात मोठी भर पडणार असून पंकजाताई व खा. प्रितमताई यांनी याबद्दल गडकरींचे आभार मानले आहेत.

Exit mobile version