मुंबई ॥ दिनांक १७ ॥
थोर विचारवंत, लढावू नेते प्रा.
एन. डी. पाटील यांच्या निधनाने महाराष्ट्र एका ज्येष्ठ आणि अनुभवी नेतृत्वाला मुकला आहे अशा शब्दांत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी शोक व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली.
पंकजाताई मुंडे यांनी म्हटले आहे की, प्रा. एन. डी. पाटील यांच्या निधनाने खूप जेष्ठ आणि अनुभवी नेतृत्वाला महाराष्ट्र मुकला. चळवळीच्या संस्कारांचे ते भक्कम स्तंभ राहतील, त्यांच्याकडून येणारी पिढी भविष्यातही शिकत राहील असं ट्विट करत त्यांनी भावपूर्ण श्रध्दांजली वाहिली.
••••