मुंबई:- दोनवेळा पुढे ढकलण्यात आलेली एमपीएससीची 23 जानेवारी रोजी होणारी परीक्षा पुन्हा एकदा रद्द झाली आहे. तांत्रिक कारणामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात येत असल्याचे एमपीएससी ने ट्विट करून स्पष्ट केले आहे.
राज्यातील आरोग्य भरती असो की म्हाडा अथवा कोणतीही परीक्षा यामध्ये सरकारचा भोंगळ कारभार समोर आलेला आहे. ठरलेल्या वेळेत परिक्षा झाल्याचं नाहीत. हाच कित्ता एमपीएससीने देखील गिरवला आहे. एमपीएससी ने अचानक परीक्षा पुढे ढकलल्याने पुण्यासह राज्यात मोठ्या प्रमाणात आंदोलन देखील झाले होते. दरम्यान 2 जानेवारी रोजीची परीक्षा 23 जानेवारीला ठेवण्यात आली होती. यासाठी विद्यार्थ्यांनी तयारी देखील केली होती.मात्र ही परीक्षा पुढे ढकलण्यात येत असल्याचे राज्य सेवा आयोगाने केले आहे.त्यामुळे पुन्हा एकदा विद्यार्थ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
एमपीएससीची परीक्षा पुन्हा रद्द !; एमपीएससीच्या भोंगळ कारभारमुळे उमेदवार वैतागले
