बीड, दि. 12 (लोकाशा न्यूज) : कोरोनाच्या तिसर्या लाटेला रोखण्यासाठी शासन आणि प्रशासनाकडून वेगवेगळ्या उपाय-योजना केल्या जात आहेत. त्याअनुषंगानेच शाळा आणि महाविद्यालये येत्या 15 फेब्रुवारीपर्यंत बंद करण्यात आलेली आहेत. शाळा जरी बंद असल्या तरी शिक्षकांना मात्र शाळेवरच थांबावे लागणार आहे. शाळेच्या वेळेत त्यांना पेंडींग कामे पुर्ण करावी लागणार आहेत, विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन तासिका घ्यावा लागणार आहेत. तसे आदेशही शिक्षणाधिकारी अजय बहिर यांनी सर्व गटशिक्षणाधिकार्यांना काढले आहेत. यामुळेच शिक्षकांसह बीईओंच्या प्रत्येक कामांवर सीईओ अजित पवार आणि शिक्षणाधिकार्यांची बारीक नजर असणार आहे. परिणामी कामात कुचराई केली तरी त्यांच्यावर थेट दिवाणी किंवा फौजदारी कारवाई केली जाणार आहे.
शिक्षणाधिकारी अजय बहिर यांनी गटशिक्षणाधिकार्यांना एक पत्र काढून त्यांनी काय करावे यासंदर्भात आदेश दिले आहेत. त्यानुसार शालेय कामकाजाच्या वेळेत 100 टक्के शिक्षक शाळेत उपस्थित राहतील याची दक्षता घ्यावी, दोन सत्रात भरत असलेल्या शाळांमध्ये शिक्षकांनी त्यांच्या शालेय सत्रामध्ये उपस्थित राहून कामकाज करावे, ‘माझी शाळा सुंदर शाळा अभियान प्रभावी अंमलबजावणी, माझे विद्यार्थी माझी जबाबदारी अभियान अंतर्गत विद्यार्थीनिहाय सातत्यपूर्ण अध्ययन आराखडा बनवून त्याप्रमाणे अंमलबजावणी वर्गनिहाय पालकांचे व्हॉटस अप ग्रुप अद्ययावत करुन घेणे व शासनाची अभ्यासमाला विद्यार्थ्यांना नियमित पाठविण्याचे नियोजन व अंमलबजावणी ऑनलाईन स्वाध्याय उपक्रमात प्रत्येक विद्यार्थ्याला सहभागी करून घेणे, वर्ग व विषयनिहाय ऑनलाईन अध्यापनाचे विविध तंत्राच्या वापराचे नियोजन व अंमलबजावणी, दीक्षा अॅप, व्ही – स्कूल फ्री अॅप वापर वाढविण्यासाठी दक्ष राहणे, ज्या विद्यार्थ्यांकडे ऑनलाईन अध्ययनाची साधने ( अॅन्ड्रॉईड मोबाईल ) नाहीत त्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी गट पध्दती, गृहभेटी इ . स्वरुपाचे नियोजन करणे तसेच वय वर्ष 15 ते 18 वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांचे प्राधान्याने लसीकरण करुन घेणेबाबत नियोजन करणे व लसीकरण पुर्ण करुन घेणे, शाळा व्यवस्थापन समिती, माता पालक संघ , शिक्षक – पालक संघ यांच्यामार्फत सर्व विद्यार्थ्यांना शासन निर्णयानुसार कोव्हिड 19 प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत जनजागृती करणे तसेच पालकांना त्यांच्या पाल्यांचा दैनंदिन शैक्षणिक सराव घेण्याबाबत मार्गदर्शन करावे, विविध प्रकारच्या शिष्यवृत्तीचे लाभ विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे पालन करुन आवश्यकतेनुसार ऑनलाईन ऑफलाईन कार्यवाही पूर्ण करणे, पूर्व उच्च प्राथमिक ( इ .5 वी ) व पूर्व माध्यमिक ( इ .8 वी ) शिष्यवृत्ती परीक्षा 2022 , नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा , एन . एम . एम. एस. परीक्षा, एन.टी.एस. परीक्षा ऑनलाईन पध्दतीने तयारी सुरु ठेवणे, जिल्हा परिषद अंतर्गत चालु असलेल्या हंगामी वस्तीगृहांमध्ये कोव्हिड 19 च्या नियमावलींचे पालन करुन विद्यार्थ्यांच्या भोजन व्यवस्थेची सोय करणे, आजारी विद्यार्थ्यांना जेवणासाठी स्वतंत्र व्यवस्था करुन तातडीने संबंधिताच्या पालकांना अवगत करुन पुढील वैद्यकिय उपाययोजना कराव्यात. शाळा व्यवस्थापनाने नेमुण दिलेल्या शिक्षकांनी सकाळ व संध्याकाळ सत्रात भोजन व्यवस्थेच्या वेळी पुर्ण वेळ उपस्थित राहावे व उपरोक्त प्रमाणे कोव्हिड 1 9 नियमावलींचे काटेकोरपणे पालन करावे, यापुढे कोव्हिड 19 बाबत शासनाकडून आणि आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून वेळोवेळी निर्गमित होणार्या आदेश व सूचना यांचे पालन करण्याची सर्वस्वी जबाबदारी स्थानिक पातळीवर मुख्याध्यापक यांची राहील, असे शिक्षणाधिकारी अजय बहिर यांनी बीईओंना दिलेल्या आदेशात म्हटले आहे.
बीईओंना दोन दिवसात विद्यार्थ्यांची
डुप्लिकेट नावे कमी करावे लागणार
ज्या शिक्षकांनी अद्याप कोव्हिड 19 प्रतिबंधात्मक लस घेतलेली नसेल त्यांच्या लसीकरणाबाबत नियोजन करुन तात्काळ लसीकरण करुन घेणेबाबत कार्यवाही करणे, ज्या विद्यार्थ्यांची अद्याप आधार नोंदणी झालेली नाही ती पूर्ण करून घेणे व प्रलंबित डुप्लिकेट आधार 2 दिवसात कमी करणे, आधार मिसमॅच रिमूव्ह करणे, पर्यवेक्षकीय यंत्रणेमार्फत शाळास्तरासाठी दिलेल्या नियमावलीची प्रभावी अंमलबजावणी होत आहे का ? याबाबत वेळोवेळी पडताळणी करुन आढावा घेणे, असे आदेश बीईओंना दिले आहेत.
अधिकारी आणि शिक्षकांना
विनाकारण फिरता येणार नाही
सर्व अधिकारी व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी शिक्षण विभाग जि.प.बीड अंतर्गत कोणत्याही कार्यालयात अथवा कार्यालयाबाहेर अनावश्यक गर्दी करु नये. तालुकास्तरावरील टपाल आपल्या कार्यालयातील प्राधिकृत केलेल्या कर्मचान्यामार्फतच या कार्यालयात सादर करण्यात यावे, तसेच कोणताही शिक्षक कार्यालयीन टपाल / संचिका घेऊन येणार नाही याची दक्षता आपण घ्यावी, कोणताही शिक्षक वैयक्तिक टपाल / संचिका या कार्यालयात घेऊन आल्यास अथवा कार्यालयाच्या परिसरात निदर्शनास आल्यास संबंधित शिक्षक व प्राधिकृत न केलेला कर्मचारी व आपल्यावर प्रशासकीय कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल याची गांभीर्याने नोंद घ्यावी, असेही शिक्षणाधिकार्यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.
आदेश न पाळल्यास होणार
फौजदारी कारवाई