बीड (प्रतिनिधी):- बीड शहरात असणार्या पेठ बीड व बुंदेलपुरा भागातील या दोनही प्रमुख भाजी मंडईत मुलभुत सुविधेसह सुशोभीकरणासाठी अधिकचा निधी देण्यात यावा अशी मागणी बीडचे आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केल्यानंतर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी सकारात्मक भूमिका घेत आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी केलेल्या मागणीनुसार बीड मतदार संघातील अधिकचा निधी दिला जाईल अशी ग्वाही या बैठकीत दिली आहे. बीड शहरात आणि ग्रामीण भागात आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या मागणीनुसार विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन देत जिल्हा नियोजन समितीमधून मंजुर झालेला निधी सर्वच यंत्रणांनी विहित वेळेत खर्च करावा असे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीडचे पालकमंत्री, जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष धनंजय मुंडे यांनी दिले आहेत.