अंबाजोगाई : अंबाजोगाई -लातूर रोडवर बर्दापूर जवळ नंदगोपाल डेअरी समोर आज (दि.९) सकाळी ८.३० वाजता लातूर – औरंगाबाद बस व ट्रकची समोरासमोर धडक झाली.
या अपघातात सहा जण जागीच ठार आणि दहा जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. हा अपघात एवढा भीषण होता की क्रेनच्या साह्याने दोन्ही वाहने बाजूला करून जखमींना बाहेर काढावे लागले. जखमींवर अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत.या अपघातानंतर काही तास या मार्गावरील वाहतूक ठप्प होती .अपघात एवढा भीषण होता की मृतदेह बाहेर काढण्यासाठी क्रेन ची मदत घ्यावी लागली.
बस -ट्रकच्या भीषण अपघातात सहा ठार, दहा गंभीर जखमी
