बीड ,प्रतिनिधी
बीडचे उपनगराध्यक्ष तथा स्वच्छता सभापती हेमंत क्षीरसागर यांच्या प्रयत्नातून बीड शारतील मुख्य रस्ते साफ सफाई करण्यासाठी आधुनिक तीन मशीन दाखल होत आहेत,त्यातील त्यातील एक माशीन आज आले आहे,या मशीनची पूजा बीड नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष तथा स्वच्छता सभापती हेमंत क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आली आहे, त्यानंतर शहरातील रस्ते सफाई कामास सुरवात करण्यात आली आहे .
.
बीड शहर वासीयांच्या मागणीनुसार आपलं बीड शहर स्वच्छ व धुळमुक्त करण्यासाठी बीड नगर परिषदेच्या माध्यमातून 3 अद्ययावत हायड्रोलीक ब्लूमर मशिन्स खरेदी करण्यात आल्या असून, आज या तीन मशिन्स पैकी एका मशीन चे उपनगराध्यक्ष तथा स्वच्छता सभापती हेमंत दादा क्षीरसागर साहेब यांच्या हस्ते नारळ फोडूण बीड शहर वासीयांच्या सेवेत टेस्टिंग करून लोकार्पित करण्यात येणार आहे. रस्त्यांवरील धूळ पूर्णपणे नाहीशी व्हावी व शहरातील रस्ते स्वच्छ राहावेत यासाठी नगर परिषद स्वच्छता समितीच्या वतीने आवश्यक ते सर्व प्रयत्न भविष्यातही करत राहुत असे यावेळी सांगण्यात आले. यावेळी नगरसेवक आमेर आण्णा,विशाल घाडगे,बिभीषण लांडगे,गुड्डू मोमीन,जिल्हाध्यक्ष पंकज बाहेगव्हानकर,उदय गायकवाड, तसेच नगर परिषदेचे स्वच्छता निरीक्षक भागवत जाधव ,व सर्व कर्मचारी उपस्थित होते.