Site icon लोकाशा-बंब न्यूज

परळीत वेश्याव्यवसाय करणाऱ्या अड्ड्यावर धाड ऑंटीसह पाच आरोपी गजाआड ; संभाजीनगरचे पोनी निरीक्षक सुरेश चाटे आणि बीडच्या एपीआय सुरेखा धस यांची संयुक्त कारवाई

परळी शहरातील फुले नगर या ठिकाणी सुरू असलेल्या एका वेश्या व्यवसाय करणाऱ्या अड्ड्यावर संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश चाटे आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षे‌ बीडच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेखा धस यांनी संयुक्त कारवाई करीत एका ऑंटीसह पाच जणांच्या मुसक्या आवळून जेरबंद केले. यावेळी पोलिसांनी एका पिडीतेची सुटकाही केली. दरम्यान याप्रकरणी संभाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की, परळी शहरांमधील फुलेनगर या ठिकाणी सर्रास एका आन्टीच्या घरी वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयातील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेखा संजय धस यांना मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार सुरेखा धस यांनी परळीत संभाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेश चाटे यांच्याशी संपर्क साधून त्याबाबतची खबर दिली. प्राप्त माहितीनुसार पोलीस निरीक्षक सुरेश चाटे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेखा धस यांनी संयुक्तरीत्या फुलेनगर या ठिकाणी ऑंटी जयश्री दत्ता जाधव वय ४५ हिच्या घरी काल सायंकाळी सहा ते साडे सहाच्या दरम्यान अचानक धाड टाकून एक पीडित महिला वेशा व्यवसाय करीत असताना पकडले त्याचबरोबर धाडीमध्ये‌ ऑंटी जयश्री जाधवसह सोमनाथ लक्ष्मण हिक्के वय २० राहणार साठेनगर परळी, रुतीक वसंत वाघमारे वय ३१ राहणार बसवेश्वर कॉलनी परळी, प्रदीप भीमराव वाघमारे वय २४ राहणार आडस तालुका केज, गणेश उत्तम कांबळे वय २६ राहणार आडस तालुका केज, परमेश्वर काशिनाथ होळंबे वय‌३२ राहणार हेळंब तालुका परळी अशा सहा आरोपींच्या मुसक्या आवळीत जेरबंद केले. यावेळी पोलिसांनी वेश्या व्यवसाय करणाऱ्या एका पिडीतेची सुटकाही केली. दरम्यान वरील सहाही आरोपींविरुद्ध संभाजीनगर पोलीस ठाण्यात गु र नंबर २०६/२०२१ कलम ३,४,५ अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा १९५६ नुसार गुन्हा दाखल केला.        परळी शहरात खळबळ माजवणारी ही धडाकेबाज कारवाई बीड जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक राजा रामास्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश चाटे, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष बीडच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेखा धस, पोलिस जमादार प्रताप वाळके, महिला पोलिस जमादार सुरेखा उगले, पोलीस कॉन्स्टेबल‌ सतीष बहिरवाल, पोलीस कॉन्स्टेबल विकाह नेवडे, महिला पोलीस कॉन्स्टेबल निलावती खटाने, व संभाजीनगर पोलीस ठाणे महिला समुपदेशन केंद्राचे शेळके यांनी केली. या सर्वांचे परळी शहरात आणि परिसरात अभिनंदन होत आहे.

Exit mobile version