Site icon लोकाशा-बंब न्यूज

एसीबीचा दणका, एक लाख रुपयांची लाच घेताना नायब तहसीलदार आणि शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षाला रंगेहात पकडले, माजलगावमधील कारवाईने बीड जिल्ह्यात खळबळ


माजलगाव : प्रतिनिधी
शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक नरवडे यांनी शेतीसाठी रस्त्याच्या प्रकरणात मंडळ अधिकाऱ्याच्या चौकशीची तक्रार केली होती ही तक्रार मागे घेण्यासाठी पुरवठा नायब तहसीलदार कुंभारराजे यांच्या मार्फत एक लाख रुपयांची लाच मागण्यात आली होती. नायब तहसीलदार कुंभारराजे यांच्या घरी सापळा लावून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने एक लाख रुपयांची लाच घेताना शेतकरी संघटनेचा नेता अशोक नरवडे व कुंभारराजे यांना रंगेहाथ पकडत चतुर्भुज केले.
शेतीरस्त्यासाठी येथील मंडलाधिकारी हे शेतकऱ्याला त्रास देत आहेत व पैशांची मागणी करीत आहेत आशा प्रकारची तक्रार शेतकरी नेते म्हणवून घेणाऱ्या व जिल्ह्याचे पद असलेल्या अशोक नरवडे याने दिली होती. या तक्रारीची चौकशी नायब तहसीलदार पुरवठा कुंभारराजे यांच्याकडे सोपविण्यात आली होती. या प्रकरणात तक्रार मागे घेण्यासाठी कुंभारराजे यांनी मध्यस्ती करून एक लाख रुपयात सेटलमेंट केली. या प्रकरणी मंडळ अधिकारी यांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार केल्यानंतर कुंभारराजे यांच्या घरी एक लाख रुपयांची लाच घेत असताना कुंभारराजे व अशोक नरवडे यांना उपअधीक्षक भारतकुमार राऊत व त्यांच्या पथकाने रंगेहाथ पकडले. शेतकरी संघटनेचा जिल्हाध्यक्ष व नायब तहसीलदार हे लाचलुचपतच्या जाळ्यात सापडल्यामुळे एकच खळबळ माजली आहे.

Exit mobile version