बीड, नगर बीड परळी या मार्गावरून रेल्वे धावावी यासाठी स्व. गोपीनाथराव मुंडे यांनी मोठे योगदान दिले, त्यांच्यानंतर या मार्गाला लोकनेत्या पंकजाताई मुंडे आणि खासदार प्रीतमताई मुंडे यांनी गती दिली, विशेष म्हणजे या रेल्वे मार्गातील प्रत्येक अडचण दूर करण्यासाठी खासदार प्रीतमताईंनी गल्ली ते दिल्ली लढा दिला आणि आणखी त्या देतही आहेत, त्यांच्या याच लढ्यामुळे आज बीड रेल्वेचे काम पूर्णत्वास जात आहे, सध्या नगर ते आष्टी 60 किमीचे काम पूर्ण झालेले आहे आज याच मार्गावरून हायस्पीड रेल्वे धावणार आहे, धावणाऱ्या याच रेल्वेचे स्वागत करण्यासाठी खासदार प्रीतमताई आष्टीकडे मुंडे साहेबांचे आशीर्वाद घेऊन निघाल्या आहेत,
तुमच आणि आपल्या संपूर्ण बीड जिल्ह्याच स्वप्न पूर्ण होण्याच्या दृष्टीने एक मोठ पाऊल आज पडल आहे बाबा, आपल्या रेल्वेच स्वागत करण्यासाठी आष्टीला निघाले आहे, आशिर्वाद द्या हे स्वप्न लवकरच पूर्ण व्हावे, अशी एक पोस्ट खासदार प्रीतमताईंनी सोशल मीडियावर टाकली आहे. दरम्यान बीड रेल्वेसाठी दिलेल्या यशस्वी लढ्यामुळे खासदार प्रीतमताईंनी बीड जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांचे मन जिंकले आहे.