पुणे – राज्यातील आरोग्य विभाग,म्हाडा आणि टीईटी पेपरफुटी आणि घोटाळ्याप्रकरणी परीक्षा घेणारी न्यासा कंपनी अडचणीत आली आहे.या कंपनीने महेश बोटले आणि बडगिरे यांकया मार्फत पेपर फोडल्याचे समोर आले आहे.या प्रकरणात पोलिसांनी निशीद गायकवाड आणि राहुल लिघोट या दोघा दलालांना अमरावती येथून अटक केली आहे. ज्या कंपनीला परीक्षा घेण्याचे कंत्राट दिले त्याच कंपनीने पेपर फोडल्याचे स्पष्ट झाल्याने अनेक मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे अशी माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली .
सार्वजनिक आरोग्य विभागाने ऑक्टोबर 2021 मध्ये गट क आणि गट ड च्या परीक्षा घेतल्या होत्या.या दोन्ही परीक्षांचे पेपर सेट करणारे आणि परीक्षा घेणारे असे अनेक जण पेपर फोडण्यात सहभागी होते.
या सर्व प्रकरणात 20 नोव्हेंबरन 2021 रोजी पहिल्यांदा गुन्हा दाखल झाला.यामध्ये पोलिसांनी लातूर येथील आरोग्य उपसंचालक कार्यालयातील प्रशांत बडगिरे याला तसेच बीड जिल्ह्यातील राजेंद्र शाहूराव सानप,मस्के,डॉ जोगदंड, संजय सानप यांना अटक केली.त्यानंतर पोलिसांनी मंत्रालयातील महेश बोटले याला ताब्यात घेतले. दरम्यान म्हाडा च्या पेपर फोडण्याचा प्रकार उघडकीस आला,यामध्ये परीक्षा घेण्याचे कंत्राट असलेल्या कंपनीचा प्रमुख प्रीतिष देशमुख याला ताब्यात घेतले.आता आरोग्य विभागाच्या परीक्षा घेणारी न्यासा ही कंपनी देखील पेपरफुटी मध्ये सहभागी असल्याचे समोर आले आहे.
बोटले आणि बडगिरे यांनी पेपर सेट केला तसेच न्यासा ने छपाई केली या दोघांनी मिळून एका उमेदवाराकडून किमान पाच लाख अन कमाल आठ ते दहा लाख रुपये गोळा केले.हा सगळा प्रकार किमान पाचशे ते एक हजार लोकांपर्यंत पोहचवण्यात आला. बोटले आणि बडगिरे यांच्याशिवाय पोलिसांनी सोमवारी अमरावती येथून निशीद गायकवाड आणि राहुल लिघोट या दोन दलालांना अटक केली आहे.पेपरफुटी चे प्रकरण समोर आल्यानंतर बीड जिल्ह्यातील अनेक एमपीडब्ल्यू आणि हिवताप कार्यालयातील कर्मचारी देखील गायब आहेत