Site icon लोकाशा-बंब न्यूज

फिलोशीपसाठी उपोषणाला बसलेल्या विद्यार्थ्यांच्या लढ्याला खा. प्रीतमताईंमुळे मिळाले बळ ! बार्टीच्या महासंचालकांनी 29 डिसेंबर रोजी विद्यार्थ्यांना चर्चेसाठी बोलावले, खा. मुंडेंना धम्मज्योती गजभीयेंनी पाठविले पत्र



परळीत, दि. 27 (लोकाशा न्यूज) : डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून देण्यात येणारी राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती पीएचडीपर्यंत देण्यात यावी, या न्याय मागणीसाठी राज्याच्या विविध विद्यापीठातील संशोधक विद्यार्थी परळीच्या तहसिल कार्यालयासमोर मागील तीन दिवसांपासून उपोषणाला बसलेले आहेत. उपोषणास बसलेल्या या विद्यार्थ्यांची सोमवारी भेट घेवून त्यांच्या लढ्याला खा. प्रीतमताईंनी मोठे बळ दिले आहे. यावेळी त्यांनी सदर विद्यार्थ्यांचा प्रश्‍न बार्टीच्या महासंचालकांच्या कानावर घातला. यावर तात्काळ अ‍ॅक्शन घेवून सदर विद्यार्थ्यांना चर्चेसाठी उद्या दि. 29 डिसेंबर रोजी दुपारी साडे बारा वाजता पुणे येथील बार्टीच्या मुख्यालयात बोलविण्यात आले आहे. तसे पत्रही बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी खा. प्रीतमताई मुंडेंना पाठविले आहे.
सोमवारी खा. प्रीतमताईंनी या विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या. संशोधक विद्यार्थ्यांना बार्टीमार्फत देण्यात येणारी अधिछात्रवृत्ती पीएचडीपर्यंत सलग मिळत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. संशोधक विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय दूर करण्यासाठी व त्यांच्या मागण्या संबंधित संस्थेपर्यंत पोहोचवण्यासाठी आमच्या स्तरावर आम्ही पूर्ण प्रयत्न करणार असल्याचा विश्‍वास यावेळी खा. मुंडेंनी विद्यार्थ्यांना दिला. तसे मुंडेंनी यासंदर्भात बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांना एक पत्रही पाठविले. खा. मुंडेंनी पाठविलेल्या या पत्रावर तात्काळ अ‍ॅक्शन घेवून बार्टीच्या महासंचालकांनी सदर विद्यार्थ्यांना उद्या दि. 29 डिसेंबर रोजी दुपारी साडे बारा वाजता पुणे येथील बार्टीच्या कार्यालयात चर्चेसाठी बोलावले आहे. दरम्यान खा. मुंडेंच्या एका आवाजानंतर संशोधक विद्यार्थ्यांचा प्रश्‍न मार्गी लागत आहे. त्यामुळे खा. मुंडेंचे सर्वत्र कौतूक होत आहे.

Exit mobile version