Site icon लोकाशा-बंब न्यूज

बीड जिल्ह्याची रेल्वे धावण्याचे स्वप्न होणार पूर्ण,नगर – आष्टी रेल्वेमार्गावर 29 डिसेंबर रोजी धावणार हायस्पीड रेल्वे,मुंडे साहेब आज असते तर स्वप्नपूर्तीबद्दल त्यांचा जनतेने नक्कीच सत्कार केला असता

बीड । दि. २३ ।
नगर-बीड-परळी रेल्वेमार्गावर सोलापूरवाडी ते आष्टी दरम्यान हायस्पीड रेल्वेची चाचणी होणार असल्याचे सूचना पत्रक मध्य रेल्वे विभागाच्या वतीने जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहे.या रेल्वेमार्गावर जलदगती रेल्वेची चाचणी होणार असल्याने जिल्हावासियांचे स्वप्न दृष्टीक्षेपात आले असून बीड जिल्ह्याची स्वप्नपूर्तीकडे वाटचाल होते आहे. दरम्यान, बीड जिल्हयात रेल्वे आणण्यासाठी भगीरथ प्रयत्न करणारे लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब आज हयात असते तर या स्वप्नपूर्तीबद्दल जनतेने त्यांचा नक्कीच सत्कार केला असता..

बीड जिल्ह्यासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असलेल्या नगर-बीड-परळी रेल्वेमार्गावर सोलापूरवाडी ते आष्टी दरम्यान लोहमार्गाचे काम पूर्ण झाले आहे.मध्य रेल्वेने जारी केलेल्या सूचनेनुसार या मार्गावर येत्या २९ डिसेंबर रोजी हायस्पीड रेल्वेची चाचणी घेण्यात येईल.हा रेल्वेमार्ग पूर्ण व्हावा यासाठी लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब यांनी अथक प्रयत्न आणि पाठपुरावा केला होता,त्यांच्या प्रयत्नांच्या यशसिद्धी मुळेच आज रेल्वेचे स्वप्न साकार होण्याकडे वाटचाल करत.आज मुंडे साहेब असते तर निश्चित जिल्हावासीयांनी या स्वप्नपूर्तीसाठी त्यांचा सत्कार केला असता अशी भावना जनसामान्यांमधून व्यक्त होते आहे.

पंकजाताई मुंडे यांनी केले राज्य सरकारचे अभिनंदन

नगर-बीड-परळी रेल्वे प्रकल्पाला केंद्र आणि राज्य सरकारने समान निधी देण्याचे निर्देश आहेत.राज्य सरकार या रेल्वेमार्गासाठी तरतुदीनुसार ९० कोटी रुपयांचा निधी देणार असल्याने भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी ट्विट करत राज्य सरकारचे अभिनंदन केले आहे.
•••••

Exit mobile version