बीड, दि. 18 (लोकाशा न्यूज) : लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांची लोकप्रियता, ज्येष्ठ नेते भीमराव धोंडे यांची साथ आणि आमदार सुरेश धस यांची चिकाटी या तीन गोष्टींमुळे नगरपंचायत निवडणूकीत आपला विजय निश्चित असल्याचे भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी शनिवारी येथे सांगितले. दरम्यान, ओबीसींचे आरक्षण गेल्याने प्रचार करतांना मी दुःखी आहे, मराठा व ओबीसींना पुन्हा आरक्षण मिळवून देण्यासाठी 26 जानेवारीपासून राज्यभर दौरे करणार असल्याचेही त्या म्हणाल्या.
जिल्ह्यातील नगरपंचायत निवडणूकीतील भाजपा-रिपाइं व महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंकजाताई मुंडे यांच्या शनिवारी आष्टी व पाटोद्यात जंगी प्रचार सभा झाल्या, त्यावेळी त्या बोलत होत्या. ज्येष्ठ नेते भीमराव धोंडे, आ. सुरेश धस, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, विजय गोल्हार, सर्जेराव तांदळे, सलीम जहांगीर, जे डी शहा, भारत काळे, अशोक लोढा, वाल्मिक निकाळजे, अशोक साळवे आदी यावेळी उपस्थित होते. पुढे बोलतांना पंकजाताई म्हणाल्या, मुंडे, धस, धोंडे असताना या निवडणूकीची काळजी करण्याची गरजच नाही. मुंडे साहेबांनी मला बेरजेच राजकारण करायच शिकवल पण जिल्ह्याच्या जनतेनं गुणाकाराच शिकवल. जिल्ह्याचे नेतृत्व करायची क्षमता फक्त मुंडे साहेबांच्या आशीर्वादाने मला मिळाली. जे लोकांच्या हिताचं आहे ते करण्यालाच मी प्राधान्य दिलं. सत्तेत असताना मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत गावा गावात रस्ते केले, कोटयवधी रूपयाचा निधी आणला. आताच्या सत्ताधार्यांनी एक रूपयाचा निधी तरी आणला का? जेवढे नारळ या जिल्ह्यात फुटले ते या लेकीने केलेल्या कामाचे फुटले, पण या दोन वर्षांत विमा नाही की कुठलाही निधी आताचे सत्ताधारी आणू शकले नाहीत. आघाडी सरकारच्या कारभाराला उत्तर देण्यासाठी ही पहिली संधी तुम्हाला मिळाली आहे, त्यामुळे या निवडणुकीत भाजपा महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन त्यांनी केले. तर ओबीसींचे आरक्षण गेल्याने आज प्रचार करतांना मी दुःखी आहे. आरक्षणाच्या सुरक्षेसाठी मी निवडणूक आयुक्तांना भेटले. मराठा, ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटल्याशिवाय फेटा किंवा हार स्विकारणार नाही असे मी ठरवले. आरक्षणाचा प्रश्न सुटल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, येत्या 26 जानेवारीपासून यासाठी राज्यभर दौरे करणार असल्याचे पंकजाताई मुंडे यावेळी म्हणाल्या. यावेळी बोलताना आ. सुरेश धस म्हणाले की, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि पंकजाताई ग्रामीण विकास मंत्री असताना कोट्यावधी रुपयांचा निधी आष्टी, पाटोदा आणि शिरुर नगरपंचायतीला मिळालेला असल्यामुळे सर्व तिन्ही ठिकाणी चांगल्या प्रकारची विकास कामे करता आली. आष्टी शहराचा कायापालट करताना दर्जेदार रस्ते, शुद्ध पिण्याचे पाणी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आष्टी शहरात पंधराशे घरकुले बांधकाम करण्यात आले असून याबाबत नगरपंचायतीने महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक पटकावलेला आहे आणि पुढील कामांसाठी भाजपाच्या सर्वच उमेदवार विजयी करण्याचे आवाहन आ.धस यांनी शेवटी केले. अध्यक्षीय समारोप करताना माजी आ. भीमराव धोंडे यांनी आ. सुरेश धस यांनी सर्वांना बरोबर घेऊन काम करावे अशी अपेक्षा व्यक्त करून तीनही नगरपंचायतमध्ये समानवाटा मिळावा अशी अपेक्षा असताना पाटोदा आणि शिरूर मध्ये ती साध्य झाली तसेच आष्टीत असेच व्हावयास हवे होते अशी खंत व्यक्त केली मात्र असे असले तरी झाले गेले सर्व विसरून आष्टीतील सर्व तेरा उमेदवार भारतीय जनता पार्टीचे आहेत. त्यामुळे सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी नगरसेवक संतोष मुरकुटे, रंगनाथ धोंडे, शरद रेडेकर यांची भांषणे झाली. यावेळी सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे, सभापती बद्रीनाथ जगताप, उपाध्यक्ष संजय आजबे,अमर निंबाळकर,यशवंत खंडागळे, शंकर देशमुख,अमोल तरटे, रघुनाथ शिंदे, बाबू कदम, जाकीर कुरेशी, या सभेसाठी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते तर सूत्रसंचालन डॉ. दीपक भवर यांनी केले.
पाटोद्यात जंगी मिरवणूक